Girish Chodankar  Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: निवडणुकीसाठी सत्ताधारी राज्यांचा भाजपकडून ‘एटीएम’ म्हणून वापर

Goa Politics: चोडणकर : कर्नाटक, गुजरातसाठी कं त्राटदारांना पिळले!

दैनिक गोमन्तक

Goa Politics: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी छत्तीसगड आणि कर्नाटक हे काँग्रेससाठी एटीएम मशीन्स बनले आहेत, असे जे वक्तव्य केले, त्याचा समाचार घेताना काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पलटवार करत भाजपची सत्ता असलेली दहा राज्ये त्यांच्यासाठी एटीएम मशीन्स आहेत का? असा सवाल केला आहे.

गुजरात आणि कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपने गोव्याचा एटीएम म्हणून वापर केला, असा आरोप चोडणकर यांनी केला आहे. भाजपने कर्नाटक निवडणुकीसाठी विविध व्यावसायिक घराण्यांकडून वसुली केली आहे आणि गुजरात निवडणुकीसाठी कंत्राटदारांकडून कोट्यवधींची रक्कम उकळण्यात आली होती. मला आशा आहे, की सावंत आता स्वतःच्या एटीएमवर स्पष्टीकरण देतील, असे म्हणत एक शिक्षकी पेशातील व्यक्ती कलेक्शन एजंट बनली होती का? हेही जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. सत्ता असलेल्या राज्यांचा असा वापर करणे, हा भाजपचा हातखंडा आहे, हे सर्वानाच माहीत आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

निवडणुकीच्या वेळी आपली सत्ता जिथे आहे, त्या राज्यांचा एटीएम म्हणून कसा वापर करावा, हे भाजपला चांगल्या प्रकारे माहीत आहे. कर्नाटकात निवडणूक झाली, त्यावेळी गोव्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी जो प्रकल्प सुरू करायचा होता, त्यासाठी एका बोलीदाराला कोट्यवधी रुपये देण्याचे कसे सांगण्यात आले, हे सर्वांनाच माहीत आहे.

निवडणुकीच्या खर्चासाठी कॅसिनो, कंत्राटदार, व्यावसायिक, बिल्डर आणि हॉटेलवाले यांची कशी पिळवणूक झाली, हे लोकांनाही माहीत आहे, चोडणकर यांनी म्हटले आहे. काम करण्यासाठी कमिशन घेतल्यानंतरही विविध कंत्राटदारही या खंडणीपासून वाचले नव्हते. गुजरात निवडणुकीसाठी पैसा उकळण्यासाठी त्यांनाही त्यावेळीं पिळून काढले होते, याची आठवण चोडणकर यांनी करून दिली आहे.

‘इंडिया’चा धसका

‘इंडिया’ या नावाची प्रमोद सावंत आणि त्यांच्या पक्षाच्या सहकाऱ्यांनी धसका घेतला आहे. विरोधी पक्ष एकत्र येतात, ते पाहून भाजप हैराण झाला आहे. त्यातूनच ही निराशा व्यक्त केली जात आहे. यावरून हे स्पष्ट होते, की ते आपल्या स्वार्थासाठी या एकत्र येणाऱ्या विरोधी पक्षांना फोडण्यासाठी कोणत्याही थराला जातील, असे चोडणकर यांनी म्हटले आहे.

डावपेचांना बळी पडणार नाही!

लोकसभा निवडणुकांवर नजर ठेवून, भाजपशासित राज्यांनी योजनांचा मोठा गाजावाजा करण्यास सुरुवात केली आहे, कारण त्यांना माहीत आहे, की तेथे भाजप विरोधी लाट आहे. सध्या ते विरोधी पक्षांना लक्ष्य करून द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. देशाची जनता किती हताश झाली आहे, हे माहीत आहे आणि त्यामुळे कोणत्याही डावपेचांना बळी पडणार नाही, असे चोडणकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

Goa Politics: म्हापशातील प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक; विकास ठप्प, सत्ताधाऱ्यांनी विकासाऐवजी केवळ घोषणाबाजी केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT