Goa Police: दक्षिण गोव्यात 46 सराईत गुन्हेगार आले पोलिसांच्या रडारवर

Goa Police: गणेशोत्सव काळात राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून दक्षिण गोव्यातील 46 सराईत गुन्हेगारांना हेरून त्यांना ताकीद देण्यात आली आहे.
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak

Goa Police: गणेशोत्सव काळात राज्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून दक्षिण गोव्यातील 46 सराईत गुन्हेगारांना हेरून त्यांना ताकीद देण्यात आली आहे. उत्सव काळात चोऱ्यांचे प्रकार वाढतात. या पार्श्वभूमीवर घरे बंद करून जाणाऱ्यांनी पोलिसांना व शेजाऱ्यांना सूचित करून जावे, असे आवाहन केले आहे.

Goa Police
Mandrem Police Station: मांद्रे पोलिस स्टेशनला हिरवा कंदील : आमदार जीत आरोलकर

पोलिसांनी गस्त वाढवली असून बाजारात पायी गस्तही घातली जात आहे. अचानक रस्त्यांवर वाहनांची तपासणी केली जात आहे.

राज्यात बाप्पाच्या स्वागताची लगबग सुरू आहे. उत्सव काळात कायदा-सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलिसांनी गस्त घालणे, सार्वजनिक मंडळांसोबत बैठका घेतल्या. उत्सव काळात काही अनुचित घटना घडल्यास त्यास मंडळ जबाबदार राहील. त्यामुळे आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, रस्त्यालगत मंडप उभारणाऱ्या मंडळांनी जास्तीत जास्त स्वयंसेवकांची नियुक्ती करावी, जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही.

भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत. दर्शनार्थींची गर्दी होऊ नये, यासाठी रांगा लावाव्यात. आरोग्य सुविधा उपलब्ध ठेवावी. वीज व अग्निशमन दलाकडून आवश्यक ना हरकत दाखला घ्यावा, अशी सूचना मंडळांना केली आहे.

वाहतूक कोंडी टाळा! : मडगावात एकूण 14 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्यांनी उत्सव काळात वाहतुकीला अडथळा होणार नाही, वाहतूक नियम पाळले जातील, याकडे कटाक्ष ठेवावा. मंडपाच्या ठिकाणी लावण्यात येणाऱ्या ध्वनिक्षेपकाचा आवाज नियमानुसार राहील, याची काळजी घ्यावी. कोणत्याही विषयावरून धार्मिक तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Goa Police
E Marketing: गणेशचतुर्थीसाठी प्रायोगिक तत्त्वावर ई-मार्केटची सुरवात

चतुर्थी हा गोव्यातील सर्वांत मोठा सण असल्याने या काळात गुन्हेगारीच्या घटना घडू नयेत, यासाठी पोलिस सतर्क आहेत. यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संशयितांना बोलावून त्यांचा पत्ता आणि इतर माहिती गोळा केली आहे. ही सतर्कता आम्ही चतुर्थीसाठीच दाखवत नसून इतर वेळीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची चौकशी करतो. आमच्या कार्यपद्धतीचा हा नेहमीचा भाग आहे. - संतोष देसाई, पोलिस उपअधीक्षक, मडगाव.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com