Accident News: अपघातग्रस्‍त तरुणाला व्‍हिलचेअर प्रदान

उगे रायझिंग क्लबचे समाजकार्य : 50 वर्षे राबवले अनेक उपक्रम
Accident News
Accident NewsDainik Gomantak
Published on
Updated on

मनोदय फडते

Accident News: काही सामाजिक, क्रीडा संस्था या एका कार्यक्रमापुरत्या मर्यादित असतात; काही संस्‍था एक-दोन क्रिकेट स्पर्धा झाल्या की वर्षाचा कार्यक्रम झाल्याप्रमाणे सुस्त राहतात. मुळात सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या अवघ्याच संस्था कार्यरत आहेत. त्यापैकी सांगे येथील उगे रायझिंग क्लब होय! सांगे भागातील सर्वांत जुना आणि कार्यरत असणारा हा क्लब यंदा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे. या क्‍लबने गत 50 वर्षांत अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत.

सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहताना युवा खेळाडूंना खासकरून फुटबॉलसाठी प्रोत्साहन दिले जाते. युवा फुटबॉलपटू तयार व्हावेत म्हणून वर्षभर दहा वर्षांखालील खेळाडूंना खास तज्‍ज्ञांमार्फत प्रशिक्षण दिले जात आहे. अखिल गोवा पातळीवर मोठ्या रकमेची बक्षिसे ठेवून फुटबॉल स्पर्धा आयोजित केल्या जातात.

यंदा संस्थेला पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याची संधी साधून विविध स्पर्धा, उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अपघातात आपला पाय गमवलेल्‍या उगेतील मिंगेल परेरा या ग्रामस्थाला मदत म्हणून संस्थेने स्वखर्चाने व्हीलचेअर प्रदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे; तर अजून एका गरजू वयस्कर व्यक्तीला चालण्यासाठी मदत व्‍हावी, या उद्देशाने हँडस्टिक देण्‍यात आली आहे.

Accident News
Mandrem Police Station: मांद्रे पोलिस स्टेशनला हिरवा कंदील : आमदार जीत आरोलकर

... तर समस्‍या सोडविणे शक्‍य

उगे रायझिंग क्लबचे साधारण नव्वदच्या आसपास सदस्य आहेत. सामाजिक उपक्रम पदरमोड करून राबवण्‍यात येतात. राज्‍य सरकारकडून भरीव मदत मिळाल्यास गावातील अनेक समस्या सोडविण्‍यासाठी पुढाकार घेणे शक्य आहे, अशी आपली भावना अध्यक्ष या नात्याने बोलताना मार्कूस परेरा यांनी व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष परेरा, खजिनदार रुजारिओ गोम्स, उपाध्यक्ष मेल्सिड फर्नांडिस आदी पदाधिकारी इतर सहकाऱ्यांसह संस्थेचा सुवर्णमहोत्सव सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यासाठी आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com