youth employment goa Dainik Gomantak
गोवा

'सरकार दारात नोकरी घेऊन येणार नाही, घरातून बाहेर पडा मुलाखती द्या'; CM सावंतांचे गोमंतकीय तरुणांना आवाहन

Unemployment in Goa CM Sawant: राज्यात सुरू असलेल्या ‘सेवा पखवाडा’ कार्यक्रमांतर्गत आयोजित एका मेळाव्यात बोलताना त्यांनी हा महत्त्वाचा मुद्दा मांडला

Akshata Chhatre

Goa jobs and youth employment:

गोव्यातील तरुण आणि नोकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी थेट भाष्य केले आहे. राज्यात सुरू असलेल्या ‘सेवा पखवाडा’ कार्यक्रमांतर्गत आयोजित एका मेळाव्यात बोलताना त्यांनी हा महत्त्वाचा मुद्दा मांडला.

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजने’च्या अंतर्गत १०० टक्के रोजगाराचा फायदा गोव्यातील लोकांना कसा होईल, यावर सरकार लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी, राज्यात खरोखर नोकऱ्यांची कमतरता आहे की, असलेल्या नोकऱ्या लोकांना करायच्या नाहीत, असा प्रश्न निर्माण होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला.

नोकऱ्या आहेत, पण स्वीकारण्याची तयारी नाही

मुख्यमंत्र्यांनी डिचोलीमध्ये नुकत्याच झालेल्या जॉब फेअरचे उदाहरण दिले. या मेळाव्यात ४९ कंपन्या सहभागी झाल्या होत्या आणि त्यांनी ३५० नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र, या नोकऱ्यांसाठी फक्त १०० लोकांनीच उत्सुकता दाखवल्याचा खुलासा त्यांनी केला. 'नोकऱ्या उपलब्ध आहेत, पण त्या स्वीकारण्याची तयारी ठेवा,' असे आवाहन त्यांनी गोव्यातील युवकांना केले. तसेच, राज्यातील नेमका रोजगार प्रश्न कोणता आहे, हे जाणून घेण्यासाठी आपण स्वतः विविध क्षेत्रातील लोकांशी संवाद साधत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

'सरकारी नोकरी'चा आग्रह आणि चुकीची धारणा

अनेक तरुण खासगी कंपन्यांमध्ये नोकरी मिळत नाही, म्हणून सरकारी नोकरीच्या मागे लागतात, यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले की, एखादा व्यक्ती त्याचे काम योग्य पद्धतीने करत असेल, तर त्याला कुणीही नोकरीवरून काढू शकत नाही, या गोष्टीला कामगार विभागानेही दुजोरा दिला आहे. त्यामुळे 'नोकरीवरून काढून टाकतील' या भीतीने सरकारी नोकरीचा आग्रह धरण्याची गरज नाही.

एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये नाव नोंदवलेल्या लोकांपैकी अनेकजण पुढील शिक्षण घेत असतात, तर काहीजण खासगी नोकरी करत असतानाही सरकारी नोकरीच्या आशेने नाव मागे घेत नाहीत. सावंत यांच्या मते, नोंदणीकृत लोकांपैकी फक्त २० टक्केच असे आहेत, जे खरोखर बेरोजगार आहेत, पण त्यांना उपलब्ध नोकऱ्या करायच्या नाहीत.

स्थानिकांच्या नकारामुळे बाहेरील लोकांना संधी

गोव्यातील लोकांना काही नोकऱ्या करायच्या नसल्यानेच त्या जागांवर बाहेरील लोकांना नोकरी दिली जाते, असे स्पष्टीकरणही मुख्यमंत्र्यांनी दिले. कंपन्या चालवणे गरजेचे असल्याने आणि स्थानिक तरुण उपलब्ध नोकऱ्यांना नकार देत असल्याने, कंपन्यांना बाहेरच्या लोकांना कामावर ठेवावे लागते, असे त्यांनी स्पष्ट केले. या परिस्थितीत बदल होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA: सलामी जोडीची 'सुपर-पॉवर'! रोहित-जयस्वाल ठरले तेंडुलकर-गांगुलीपेक्षाही अधिक 'विस्फोटक', 25 वर्षांचा विक्रम मोडला

Goa Crime: हरमलमध्ये खळबळ: गेस्ट हाऊसमध्ये आढळला परदेशी नागरिकाचा कुजलेला मृतदेह, पोलिसांचा तपास सुरु

IndiGo Crisis: 'प्रवाशांना रविवारी रात्रीपर्यंत रिफंड द्या', केंद्र सरकारचा 'इंडिगो 'ला आदेश; अन्यथा कारवाईचा इशारा

Goa Politics: 'ही तू-तू-मैं-मैंची वेळ नाही', युतीच्या बैठकीकडे RGPची पाठ; काँग्रेसला दिला गोवा फॉरवर्डने हात!

VIDEO: विकेट मिळताच जल्लोष असा की...: विराट कोहली आणि कुलदीप यादवचा LIVE सामन्यातील 'कपल डान्स' VIRAL!

SCROLL FOR NEXT