Goa Employment: "गोव्यात काहीच कमी नाही! मानसिकता बदला; खासगी नोकऱ्या करा" तरुणाईला मुख्यमंत्र्यांचा कानमंत्र

Youth Employment Goa: उद्योग संघटना आणि कामगार विभागासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी गोव्याच्या रोजगार आणि कामगार कल्याणासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे मांडले
Goa employment news
Goa employment newsDainik Gomantak
Published on
Updated on

CM Pramod Sawant On Jobs: गोव्यातील उद्योगांनी स्थानिक युवकांना प्राधान्य द्यावे आणि गोव्याबाहेरील कंत्राटदारांऐवजी गोमंतकीय कंत्राटदारांनाच नियुक्त करावे, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले आहेत. उद्योग संघटना आणि कामगार विभागासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी गोव्याच्या रोजगार आणि कामगार कल्याणासंदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे मांडले.

स्थानिक रोजगारावर मुख्यमंत्र्यांचा भर

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, "स्थानिक तरुणांनी खासगी क्षेत्रात नोकऱ्या स्वीकारल्या पाहिजेत, असे न केल्यास इतर राज्यांमधील लोक त्या संधी हिसकावून घेतील." रोजगाराच्या बाबतीत स्थानिकांनी आपली मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

ते पुढे म्हणाले की, गोव्यातील विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. आयटीआय ते इंजिनियरिंगपर्यंत आणि वाणिज्य क्षेत्रातही अनेक संधी आहेत. या संधींचा गोव्याच्या तरुणांनी पुरेपूर फायदा घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

मुख्यमंत्र्यांनी उद्योगांना काही महत्त्वाचे आदेशही दिले:

  • कंत्राटदारांना प्राधान्य: उद्योगांना त्यांच्या गरजेनुसार वाहतूक सुविधा पुरवल्या जातील. पण कंत्राटदार नियुक्त करताना त्यांनी गोव्याबाहेरील कंत्राटदारांना काम न देता, गोमंतकीय कंत्राटदारांनाच नियुक्त करावे.

  • स्थायी नोकऱ्या आणि किमान वेतन: ज्या तरुणांनी अप्रेंटिसशिप पूर्ण केली आहे, त्यांना कंपन्यांनी कायमस्वरूपी नोकरी देणे बंधनकारक असेल. तसेच, कामगारांना किमान वेतन आणि योग्य वाहतूक सुविधा सुनिश्चित केल्या जातील.

Goa employment news
Goa Government Job: 40 ते 45 हजार पगाराच्या सरकारी नोकरीची संधी; गोमंतकीयांनो GPSC ची जाहीरात आली, येथे करा अर्ज
  • प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना: राज्यातील सर्व खासगी कामगारांना प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजनेखाली आणले जाईल.

  • निधीचा योग्य वापर: कामगार कल्याण आणि बांधकाम कामगार कल्याण निधीमध्ये एकूण ६०० कोटी रुपये जमा झाले आहेत. ही रक्कम कामगारांच्या फायद्यासाठी योग्य प्रकारे वापरली जाईल.

कामगार शोषणाला आळा घालणार

गोवा सरकार कामगार शोषणाला कोणत्याही परिस्थितीत थारा देणार नाही, असे मुख्यमंत्री सावंत यांनी ठामपणे सांगितले. कामगार आयुक्तांच्या माध्यमातून सर्व कामगार निरीक्षक तंत्रज्ञानाचा वापर करून अशा घटना शोधण्यासाठी मोहिमा राबवतील. या उपाययोजनांमुळे गोव्यातील कामगारांना सुरक्षित कामाचे वातावरण मिळेल अशी अपेक्षा आहे असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com