Electricity Minister Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Sudin Dhavalikar: राज्‍यात सर्वत्र भू-वीजवाहिन्या

Sudin Dhavalikar: रस्ते खोदले जातील, जनतेने सहकरावे;

दैनिक गोमन्तक

Sudin Dhavalikar: राज्यातील चाळीसही मतदार संघात भूमिगत वीज वाहिन्यांचे जाळे विणले जाणार असून 1965 साली तत्कालीन बांदोडकर सरकारने टाकलेल्या वीजवाहिन्या व उपकरणे जर्जर झाल्या आहेत. त्यामुळे वीजपुरवठ्यावर विपरित परिणाम होतो. त्यातून सुटका मिळण्यासाठी विद्यमान सरकारने भूमिगत वीजवाहिन्यांचे जाळे विणले असल्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

कुंकळ्‍ळी पालिका क्षेत्रात सुमारे 45 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणार असलेल्या चार नवीन फिडर व भूमिगत वीजवाहिन्यांच्या प्रकल्प कामाच्‍या शुभारंभीप्रसंगी ढवळीकर बोलत होते.

यावेळी स्थानिक आमदार युरी आलेमाव, केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा, नगराध्यक्ष लेड्री मास्कारेन्‍हस, नगरसेवक, मुख्य वीज अभियंते, व्यवस्थापकीय अभियते वीज खात्याचे अधिकारी उपस्थित होते. भूमिगत वीजवाहिन्यांचे जाळे विणताना रस्ते खोदावे लागणार असल्याने जनतेने थोडी कळ सोसावी. सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.

युरी आलेमाव म्हणाले, कुंकळ्‍ळी मतदासंघांच्या विकासात सरकारकडून योग्य ते सहकार्य मिळत असून येणाऱ्या काही दिवसांत अनेक कामे मार्गी लागणार आहे. ढवळीकर हे नशीबवान मंत्री असून सरकार कोणतेही असो त्यात ढवळीकर मंत्री असतात. पुढे केंद्रात व राज्यात भाजप सरकार कोसळून जर विरोधी पक्षाची युती होऊन सरकार स्थापन झाले तर तेथही ढवळीकर निश्चित असतील असा टोला युरींनी लगावला. दरम्‍यान, आमदार एल्टन डिकॉस्टा यांनीही यावेळी आपले विचार मांडले.

45 कोटी खर्च करणार

अधीक्षक अभियते राजीव यांनी भूमिगत वीज वाहिन्या व फिडर प्रकल्पाची माहिती दिली. या प्रकल्पासाठी 45 कोटींचा खर्च येणार आहे. मल्लांगिनी, चिंचोणे, कुंकळळी व धर्मापुर असे 11 केव्ही चे चार फिडर उभारले जाणार व सत्तर किलोमीटर लांबीची भूमिगत वीज वाहिनी टाकली जाणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प जूनपर्यंत पूर्ण होणार असल्याचा दावा त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT