Goa Congress: काँग्रेसमध्‍ये गटबाजी; पक्षाचे राज्य प्रभारी मणिकम् टागोर उद्या गोव्‍यात

Goa Congress: काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आल्याने स्थानिक नेत्यांशी वैयक्तिक चर्चा करण्यासाठी पक्षाचे राज्य प्रभारी मणिकम् टागोर गुरुवार दि. 30 नोव्‍हेंबर रोजी गोव्यात दाखल होत आहेत.
Goa Congress:
Goa Congress:Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Congress: काँग्रेसमध्ये गटबाजी उफाळून आल्याने स्थानिक नेत्यांशी वैयक्तिक चर्चा करण्यासाठी पक्षाचे राज्य प्रभारी मणिकम् टागोर गुरुवार दि. ३० नोव्‍हेंबर रोजी गोव्यात दाखल होत आहेत. शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ते प्रत्येक नेत्याशी बंद दाराआड चर्चा करतील.

Goa Congress:
Goa Student: विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून दूर राहणे आवश्‍यक

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काही संघटनात्मक बदल करावयाचे असल्यास त्याबाबतचा अहवाल ते पक्षश्रेष्ठींना सादर करणार आहेत. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अमित पाटकर यांची निवड झाल्यानंतर त्यांच्याविरोधात गिरीश चोडणकर यांचा गट सक्रिय झाला आहे.

दोन्ही गटांकडून दिल्लीला तक्रारी करणे सुरूच राहिल्याने पक्षश्रेष्ठींनी टागोर यांना वस्तुस्थितीचा आढावा घेण्यासाठी गोव्यात पाठवण्याचे ठरवले आहे. ते 30 रोजी दुपारी साडेतीन वाजता गोव्यात दाखल होतील. पणजीतील काँग्रेस हाऊसमध्ये गुरुवारी सायंकाळी ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेणार आहेत. त्यानंतर शुक्रवारी ते नेत्यांशी वैयक्तिक चर्चा करतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Bharti Pawar Goa in Charge
Goa Congress RG Meeting
RGP Congress Alliance Talks Goa:
Girish Chodankar Congress Alliance
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com