Goa Accident Dainik Goamantak
गोवा

Accident Death: दोन अपघातांत दोन दुचाकीस्‍वार ठार

Accident Death: अलीकडच्‍या काळात राज्यात दरदिवशी रस्‍तेअपघातांत बळी जाण्‍याचे प्रमाण वाढले आहे.

दैनिक गोमन्तक

Accident Death: अलीकडच्‍या काळात राज्यात दरदिवशी रस्‍तेअपघातांत बळी जाण्‍याचे प्रमाण वाढले आहे. गेल्‍या 24 तासांत बांबोळी व वास्को येथे झालेल्‍या दोन वेगवेगळ्‍या अपघातांत दोघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. पर्वरीत वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय असलेले श्रीपाद मोरजकर (54) हे काल रात्री उशिरा बांबोळी येथून पर्वरीकडे घरी परतत होते.

बांबोळी येथे ‘नियाझ’ रेस्टॉरंटजवळ पोहोचले असता भरधाव वेगात असलेल्या मोरजकर यांचा दुचाकीवरील ताबा सुटला व ते रस्त्यावर आपटले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला. त्यांना त्वरित गोमेकॉ इस्पितळात दाखल करण्‍यात आले, परंतु उपचार सुरू असतानाच आज पहाटे चारच्या सुमारास त्यांची प्राणज्‍योत मालवली. उत्तरीय तपासणीनंतर

मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

दुसरा अपघात वास्कोतील एफ. एल. गोम्स मार्गावरील शिवम सिनेथिएटरजवळ काल रात्री घडला. त्‍यात बेलाबाय येथील समीर गोसावी (५२) यांचा मृत्यू झाला. दुचाकीवरून रस्‍त्‍यावर पडल्‍यामुळे त्‍यांच्‍याही डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्‍यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ते एका पायाने अपंग होते, त्यामुळे तीनचाकी वाहन चालवायचे. त्यांचा बेलाबाय येथे रस-आम्लेट व इतर खाद्यपदार्थाचा गाडा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संपादकीय: आमची मते कुठे गेली?

Chandra Gochar 2026: 4 राशींसाठी सुरू होणार 'गोल्डन टाइम'! कर्क राशीत चंद्राच्या प्रवेशाने धनलाभाचे योग, नशीबही देणार साथ

Goa Development: 2014नंतर गोव्याचा 'आश्‍चर्यकारक' विकास; झुआरी पुलाची रचना पाहून शिवराजसिंह चौहान भारावले

Pajifond Cemetery Issue: पाजीफोंड कब्रस्तानचा प्रश्न सोडवू; दामू नाईकांची पाहणी, विजय सरदेसाईंवर टीका

IND vs WI T20I: ODIचा थरार संपताच आता टी-20चा धुमाकूळ! भारत-वेस्ट इंडिजमध्ये 5 सामन्यांची मालिका; जाणून घ्या तारीख, वेळ अन् ठिकाण

SCROLL FOR NEXT