IFFI Goa 2023: ‘इफ्‍फी’ 2047 पर्यंत जागतिक महोत्‍सव

IFFI Goa 2023: अनुराग ठाकूर : प्रोत्साहनपर निधीत ४० टक्क्यांनी वाढ; ‘कॅचिंग डस्ट’ने उघडला पडदा
Anurag Thakur
Anurag ThakurDainik Gomantak

विलास ओहाळ

IFFI Goa 2013: दरवर्षी गोव्‍यात होणारा भारतीय आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सव (इफ्‍फी) 2047 पर्यंत जगातील एक अव्‍वल दर्जाचा महोत्‍सव ठरेल. त्‍या दिशेने प्रयत्‍न सुरू आहेत.

भारतात चित्रपटांचे चित्रिकरण करणाऱ्या विदेशी निर्माते किंवा कपंन्यांना दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहनपर निधीत 40 टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे.

Anurag Thakur
Job Scam: अभियंता भरती ताबडतोब रद्द करा! CM सावंत यांना श्रेष्‍ठींकडून कोणत्‍याही क्षणी आदेश शक्‍य

‘बिग बजेट’ चित्रपटांसाठी भारत सरकारने प्रोत्साहन निधीत 2.5 कोटींपासून ते 30 कोटींपर्यंत भरीव वाढ केली आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये सोमवारी 54 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

‘कॅचिंग डस्ट’ या चित्रपटाने इफ्‍फीचा पडदा उघडला. यावेळी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष आमदार दिलायला लोबो, मुख्य सचिव पुनित कुमार, केनन वाझ, अभिनेते सनी देओल,

अभिनेत्री माधुरी दीक्षित, शाहीद कपूर यांची उपस्थिती होती. या मान्यवरांच्या हस्ते चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.

ठाकूर म्हणाले, चित्रपट क्षेत्राचा खरा मजबूत खांब हा प्रेक्षक आहे. प्रेक्षक थिएटरमध्ये जाऊन जोपर्यंत चित्रपट पाहत नाहीत, तोपर्यंत पैसा निर्माण होणार नाही आणि चित्रपटही निर्माण होणार नाही. मागील काही काळात सनी देओल यांच्या ‘गदर-२’ने सर्व विक्रम मोडले. दुसरे शाहरूख खान आहेत, त्यांचा ‘जवान’पासून ‘पठाण’,

‘केजीएफ-२’, ‘आरआरआर’ यासारख्या एकापेक्षा एक चित्रपटांनी विक्रम मोडले आहेत. आपण कधीही हॉलिवूड, कॉलिवूड, सँडलवूड म्हणून चित्रपटसृष्टीकडे पाहत नाही, तर आपण त्यास ‘भारतीय सिनेमा’ म्हणून ओळखतो, असे ठाकूर म्हणाले.

गोव्‍याला बनविणार चित्रपट निर्मितीचे हब : मुख्‍यमंत्री

गोव्यात निर्माण होणाऱ्या फिल्म सिटीमुळे ‘फिल्‍म फ्रेंडली डेस्टिनेशन'' म्हणून राज्याची ओळख तयार होईल. गोवा चित्रपट निर्मितीचे हब बनविण्यासाठी गोवा मनोरंजन संस्थेने फिल्म सिटीच्‍या निर्मितीसाठी पावले उचलली आहेत. पुढील वर्षीचा इफ्फी यापेक्षाही भव्य असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

चित्रपट महोत्सवामुळे गोव्यातील चित्रपट क्षेत्र हळूहळू भरारी घेत आहे. इफ्फीत यावर्षी कोकणी सिनेमांचे सादरीकरण प्रिमीयर व नॉन प्रिमियर विभागात होणार आहे. त्यासाठी २८ प्रवेशिकांमधून सात चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. पुढील २५ वर्षांत आम्ही ‘विकसित भारत’ हा विचार घेऊन पुढे पाऊल टाकुया, असे आवाहनही त्‍यांनी केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com