Goa GramPanchayat Election  Dainik Gomantak
गोवा

वारखंड ग्रामपंचायत लढणार स्थगितीचा खटला: तुळसकर

स्टॉप वर्क ऑर्डर पाळण्यायोग्य नसल्याचा दावा पंचायतीने करून अधिकार क्षेत्र ओलांडला

दैनिक गोमन्तक

मोरजी: वारखंड-नागझर पंचायत मंडळाने एक विशेष बैठक घेतली असून, 15 मार्च रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीच्या दिवशी पंचायतीच्या अतिरिक्त संचालकांसमोर स्थगितीचा खटला लढविण्याचा निर्णय वारखंड पंचायतीने घेतला आहे, अशी माहिती सरपंच संजय तुळसकर यांनी दिली.

एका शेतकऱ्याच्या तक्रारीवर कारवाई करत वरखंड-नागझर पंचायतीने सुरू असलेल्या मोपा विमानतळ लिंक रोडच्या संदर्भात एम. एस. अशोका बिल्डकॉन लिमिटेड कंपनीला काम थांबवण्याचे आदेश दिला होता.

स्टॉप वर्क ऑर्डरच्या संदर्भात, कंत्राटदार एम. एस. अशोका बिल्डकॉन लिमिटेडने मोपा विमानतळ लिंक रोडच्या सुरू असलेल्या कामावर वरखंड नागझर पंचायतीने जारी केलेल्या स्टॉप वर्क ऑर्डरच्या विरोधात अपील दाखल केले होते आणि आवाहन केले होते की, लिंक रोडच्या बांधकामासाठी जमीन संपादित करण्यात आली आहे. भारत सरकार आणि पंचायतीला जमिनीवर कोणतेही अधिकार नाहीत. स्टॉप वर्क ऑर्डर पाळण्यायोग्य नसल्याचा दावा पंचायतीने करून अधिकार क्षेत्र ओलांडला आहे.

शुक्रवारी वरखंड-नागझर पंचायतीचे सरपंच तुळसकर यांनी स्थगितीच्या मुद्द्यांवर पंचायत मंडळाची विशेष बैठक घेतली. वकील नियुक्त करण्याचा आणि पंचायतीच्या अतिरिक्त संचालकांसमोर खटला लढण्याचा निर्णय घेण्यात आला.

अतिरिक्त संचालकांसमोर बाजू मांडणार

आम्ही स्थगिती आदेशावर विशेष बैठक घेतली आहे. ज्यामध्ये एम. एस. अशोका बिल्डकॉन अपिलार्थी आहे आणि पंचायतीला मोपा लिंक ऑर्डरवरील स्टॉप ऑर्डरच्या संदर्भात प्रतिवादी करण्यात आले आहे. कंपनीने कागदपत्रांसह उत्तर दाखल केले आहे आणि एक अर्ज देखील दाखल केला आहे. चर्चेअंती खटला लढवून आमची बाजू पंचायतीच्या अतिरिक्त संचालकांसमोर मांडण्याचा निर्णय घेतल्याचे सरपंच तुळसकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: विद्यार्थ्यांनो लक्ष द्या; ही संधी गमावू नका!! 'गोमेकॉ' ने केलीये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये लक्षणीय वाढ

Sao Jose De Areal Gramsabha: औद्योगिक कचऱ्याच्या प्रदूषणामुळे कारखान्यांवर कडक कारवाईची मागणी

Goa Fraud: PMO मध्ये सिक्युरिटी इन्चार्ज असल्याचं भासवून टॅक्सीचालकांना गंडा; तोतया व्यक्तीविरोधात तक्रार दाखल!

Calangute: बीचवरुन बेपत्ता झाला 9 वर्षाचा परदेशी पर्यटक, गोवा पोलिसांनी पुन्हा घडवली कझाकस्तानच्या मायलेकांची भेट

Goa Today's Live News: राज्य सरकारच्या सहकार पुरस्कारांची घोषण

SCROLL FOR NEXT