गोव्यात पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात जूनमध्ये

शिक्षण संचालनालयाने शुक्रवारी परिपत्रक जारी केले आहे.
Students
Students Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोवा राज्यात पुढील शैक्षणिक वर्ष 2022-23 चा कालावधी 6 जून 2022 ते 29 एप्रिल 2023 असणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. शिक्षण संचालनालयाने शुक्रवारी जारी केलेल्या परिपत्रकात शैक्षणिक वर्ष 2022-2023 च्या सुट्ट्या आणि सूचनांचा समावेश आहे. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात जूनमध्ये होईल. (Goa Education News)

Students
संविधानात्मक पदांचा दर्जा टिकवावा: उपराष्ट्रपती

वेळापत्रक

1. पहिली टर्म - 6 जून 2022 ते 18 ऑक्टोबर 2022
2. दुसरी टर्म - 7 नोव्हेंबर 2022 ते 29 एप्रिल 2023

सुट्ट्यांच्या तारखा

1. गणेश चतुर्थी - 30 ऑगस्ट 2022 ते 6 सप्टेंबर 2022
2. दिवाळी - 19 ऑक्टोबर 2022 ते 5 नोव्हेंबर 2022
3. ख्रिसमस - 24 डिसेंबर 2022 ते 2 जानेवारी 2023
4. उन्हाळी सुट्टी - 1 मे 2023 ते 3 जून 2023

शैक्षणिक वर्षात एकूण कामकाजाच्या दिवसांची संख्या 220 पेक्षा जास्त असेल. अंतिम वार्षिक परीक्षेचे (Exam) निकाल 28 एप्रिल 2023 पूर्वी शाळांनी (School) जाहीर करू नयेत, असे देखील शिक्षण संचालनालयाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com