Tourist in Goa Dainik Gomantak
गोवा

खासगी टॅक्सीचालकांची मनमानी, पर्यटकांची नाराजी

खासगी गाड्यांसाठी अव्वाच्या सव्वा भाडं उकळलं जात असल्याने पर्यटकांना आर्थिक भुर्दंड

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात कोरोनाची लाट ओसरताच पर्यटकांचा ओघ पुन्हा सुरु झाला आहे. पर्यटक विविध मार्गांनी गोव्यात दाखल होतात. मात्र गोव्यात येताच टॅक्सीचालकांची मनमानी आणि दर पाहून त्यांचे डोळे विस्फारतात. त्यामुळे साहजिकच पर्यटकांची टॅक्सीचालकांकडे पाठ होत असल्याचं चित्र आहे. (Tourist in Goa News Updates)

गोव्यात (Goa) पर्यटक रेल्वे, विमान किंवा बसने दाखल होतात. गोव्यात पर्यटन करण्यासाठी प्रवाशांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेपेक्षा खासगी वाहनं सोयीस्कर ठरतात, मात्र खासगी टॅक्सीचालकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळली जात असल्याने पर्यटकांमध्ये नाराजी चित्र आहे. पर्यटन हंगाम सुरु होताच भाड्याच्या बाईक आणि टॅक्सींचे दरही गगनाला भिडतात. त्यामुळे पर्यटकांवर जास्तीचा भुर्दंड पडतो.

पर्यटकांसमोर (Tourist) दुसरा कुठलाही पर्याय नसल्यामुळे जास्तीचे पैसे देऊन गाडी भाड्याने घ्यावी लागते. गोव्यात सार्वजनिक वाहतूकही मर्यादित असल्याने तसेच त्याला वेळेची मर्यादा असल्याने जास्तीचे पैसे मोजून पर्यटक खासगी गाड्या भाड्याने घेतात. पर्यटकांनी खासगी टॅक्सीचालकांच्या मनमानीवर नाराजी व्यक्त केली आहे. ओला, (Ola) उबरसारखे पर्याय गोव्यात उपलब्ध नसल्याने पर्यटकांना खासगी भाड्याच्या वाहनांवर अवलंबून राहावे लागते. जास्त पैसे देत पर्यटक रेंट अ कार किंवा रेंट अ बाईक घेऊन पर्यटन करावं लागत असल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचा सूर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

SCROLL FOR NEXT