केजरीवालांच्या योजनांमध्ये छुपा अजेंडा : काँग्रेस

अरविंद केजरीवाल गोव्याला खोटी आश्वासने देत असल्याचा आरोप
Ajay Maken in Congress PC in Goa
Ajay Maken in Congress PC in GoaDainik Gomantak

पणजी : आपचे दिल्ली मॉडेल महागाई आणि वीज बिलावरील छुपे शुल्कांनी भरलेला आहे. अरविंद केजरीवाल गोव्याला खोटी आश्वासने देत आहेत, कारण दिल्लीत दिलेली वचने ते पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत." असा आरोप काँग्रेस सरचिटणीस अजय माकन यांनी शनिवारी केला आहे. अजय माकन यांनी शनिवारी पणजीत पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल गोव्यातील लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत असल्याचा निशाणा साधला. यावेळी काँग्रेस प्रवक्त्या अलका लांबा, काँग्रेस नेत्या रागिणी नायक, गोवा काँग्रेस प्रवक्ते तुलिओ डिसोझा आणि सुनील कवठणकर उपस्थित होते. (Ajay Maken in Congress PC in Goa News Updates)

Ajay Maken in Congress PC in Goa
स्वाभिमानी मयेकर भाजपला चांगलाच धडा शिकवतील: संतोषकुमार सावंत

केजरीवाल यांनी 2015 साली 8 लाख रोजगार निर्माण करण्याची योजना जाहीर केली होती. मात्र त्यात ते अपयशी ठरले आहेत. इथे गोव्यात त्यांनी बेरोजगारी भत्ता देण्याचे आश्वासन दिले आहे, मात्र दिल्लीत ही योजना नाही. असा आरोप माकन यांनी पत्रकार परिषदेत केला. केजरीवालांची गोवा विधानसभेसाठी (Goa Assembly Election) मोफत वीज आश्वासन हे गोवावासियांना दिलेले आणखी एक खोटे आश्वासन आहे. दिल्लीचे वीजदर खूप महाग आहेत. त्यामुळे ते फक्त लोकांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा टोला माकन यांनी लगावला.

Ajay Maken in Congress PC in Goa
ओल्ड गोव्यातील वादग्रस्त बंगला पाडण्याचे आदेश

कोविड काळात आपचे (Aam Aadmi Party) मोहल्ला क्लिनिक बंद होते. सरकारच्या गैरव्यवस्थापनामुळे दिल्लीत अनेक कोविड रुग्णांचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोपही अजय माकन यांनी केला. कोविड मृत्यूचे प्रमाण दिल्लीत सर्वाधिक होते, असंही माकन पुढे म्हणाले. दिल्लीत प्रत्येक वेळी आरोग्य क्षेत्रावरील अर्थसंकल्प विनावापर राहतो. आपने दिल्लीत एकही नवीन रुग्णालय बांधलेले नाही. सध्याची सर्व 39 सरकारी रुग्णालये काँग्रेस सरकारने बांधली होती, असे माकन यांनी स्पष्ट केले.

दरम्यान रागिणी नायक यांनीही गोव्यातील भाजप (BJP) सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, महिलांवर कोणताही गुन्हा घडल्यास भाजप पीडितांना दोषी ठरवते. गोव्यातील भाजप सरकार महिलांना सुरक्षित वातावरण देण्यात अपयशी ठरले आहे. दिवसेंदिवस येथे महिलांवरील गुन्हे वाढत आहेत, असे त्या म्हणाल्या. गोव्यात काँग्रेस पक्ष अधिकाधिक महिला पोलीस स्टेशन स्थापन करणार असून महिलांना सुरक्षा देणार असल्याचे नायक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com