Tourist Death Dainik Gomantak
गोवा

Calangute Tourist Death: कळंगुटमध्ये लोखंडी सळ्यांनी घेतला पर्यटकाचा जीव; बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

Calangute Tourist Death Case: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मास कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीचे मालक अल अमीन चेरकला अहमद यांच्याविरुद्ध हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

म्हापसा: येथील नाईकावाडो परिसरात मेनेझिस सुपरमार्केटजवळ गटार बांधकामादरम्यान उघड्यावर ठेवलेल्या लोखंडी सळ्यांमुळे मणिपूर येथील ३२ वर्षीय पर्यटक नगाशान्मी ए. शिमरेई यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मास कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीचे मालक अल अमीन चेरकला अहमद यांच्याविरुद्ध हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. गटार बांधकाम करताना आवश्यक सुरक्षा व्यवस्था आणि सूचना फलक न लावता लोखंडी सळ्या उघड्यावर ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

१४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्रीपूर्वी ही घटना घडली. मेनेझिस सुपरमार्केटकडे जात असताना शिमरेई यांचा उघड्यावर ठेवलेल्या लोखंडी सळीवर पडून अपघात झाला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, या प्रकरणी कळंगुट पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक साईल जी. वैगणकर यांनी तक्रार दाखल केली आहे. संबंधित बांधकामातील निष्काळजीपणामुळे मानवी जीव धोक्यात आल्याचा आरोप असून, भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १०६(१) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आग्नेलोंची लोबोंवर टीका

कळंगुटचे माजी आमदार आग्नेलो फर्नांडिस यांनी या घटनेसाठी गोवा राज्य साधनसुविधा महामंडळाचे चेअरमन, स्थानिक आमदार मायकल लोबो आणि महामंडळाच्या अभियंत्यांना जबाबदार धरले. पर्यटकाच्या मृत्यूस जबाबदार धरून जीएसआयडीसीच्या चेअरमनवर कारवाई का करू नये, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IDC Exit Support Scheme: गोव्यात बंद उद्योगांना मिळणार 'नवसंजीवनी'! आयडीसीच्या योजनेला मुदतवाढ; 1,969 रोजगारांची अपेक्षा

Barge Sale Tender: 4 कोटींच्या बार्ज-ड्रेजर विक्रीसाठी पुन्हा निविदा; गोव्यात फेरीमार्गांवरील गाळ उपशाचा प्रश्न कायम

Shai Hope 5 Major Records: शे होप ठरला रेकॉर्डब्रेकर! धमाकेदार शतकासह नावावर केले 5 मोठे रेकॉर्ड; ख्रिस गेलला मागे टाकत रचला इतिहास

River Pollution: म्हापसा नदीच्या पाण्यात फिकल कोलिफॉर्म 17 पट जास्त! प्रदूषणाच्या अहवालाने चिंता वाढवली

Baba Vanga Prediction: 2026 संपण्यापूर्वी जगाचा विनाश होणार? बाबा वेंगा यांच्या कथित भविष्यवाणीने जगभरात खळबळ, नेमकं काय सांगितलंय भाकितात?

SCROLL FOR NEXT