Tillari Canal Repair Dainik Gomantak
गोवा

Tillari Canal Repair: तिळारी कालवा दुरुस्ती मार्चपासून; पर्यायी पाणीव्यवस्था अपूर्ण असल्याने काम लांबणीवर

Tillari canal repair March 2027: तिळारी धरणातील पाणी दोन कालव्यांद्वारे मुख्य कालव्यात येते. महाराष्ट्र हद्दीतील मुख्य कालव्याची स्थिती बिकट झाल्याने त्याच्या दुरुस्तीचा निर्णय दोन्ही राज्यांनी घेतला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: तिळारीच्या मुख्य कालव्यातून गोव्यात पाणी आणण्यासाठी पर्यायी व्यवस्था पूर्ण करण्यास आणखी दोन ते तीन महिने लागणार असल्याने कालव्याच्या दुरुस्तीचे काम मार्चपासून हाती घेण्यात येईल, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी शनिवारी दिली. महाराष्ट्र सरकारनेही गोव्याची ही मागणी मान्य केली आहे.

तिळारी धरणातील पाणी दोन कालव्यांद्वारे मुख्य कालव्यात येते. महाराष्ट्र हद्दीतील मुख्य कालव्याची स्थिती बिकट झाल्याने त्याच्या दुरुस्तीचा निर्णय दोन्ही राज्यांनी घेतला आहे. या कामासाठी गोव्याचा ७५ टक्के, तर महाराष्ट्राचा २५ टक्के निधी असे प्रमाण निश्चित झाले आहे. दुरुस्तीचे काम १ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन होते.

मात्र, पर्यायी पाणीव्यवस्था अद्याप पूर्ण झालेली नाही. पाइपलाइनचे काम सुरू असून, ते पूर्ण होण्यासाठी दोन ते तीन महिने लागणार आहेत. त्यामुळे मार्चपासून दुरुस्ती सुरू केली जाणार आहे. शिरोडकर ७ ऑक्टोबरला पाहणी करणार आहेत.

‘म्‍हादई’साठी ‘प्रवाह’ला पत्र

‘‘कळसा-भांडुराप्रकरणी गोवा, महाराष्‍ट्र आणि कर्नाटकच्‍या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्‍या पथकामार्फत म्‍हादई पात्राची येत्‍या पावसाळ्यात प्रत्‍यक्ष पाहणी करण्‍यात यावी, अशी मागणी राज्‍य सरकारने प्रवाह समितीकडे पत्राद्वारे केली आहे; परंतु प्रवाहने अजून सरकारच्‍या पत्राला उत्तर दिलेले नाही’’, असेही मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: मनोज परबांच्या भूमिकेची वीरेश बोरकरांना प्रतीक्षा; २ ऑक्टोबरची 'मोठी घोषणा' अखेर झालीच नाही

Seva Sankalp Campaign: 'सरकार तुमच्या दारी'; मुख्यमंत्र्यांनी बार्देशातील 200 नागरिकांच्या समस्या ऐकल्या, अधिकाऱ्यांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Viral Video: हातात काठी नाही, मनात भीती नाही! महिलांनी चक्क अजगराला दोरीने बांधलं अन् शेताबाहेर नेलं; थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

खरी कुजबुज: मुख्यमंत्र्यांना जनतेचा वेढा

VIDEO: 6 षटकार, 5 चौकार अन् 71 धावांची वादळी खेळी! युवराज सिंहने दाखवला जुन्या 'युवी'चा अंदाज, ऑस्ट्रेलियाला धू धू धुतलं

SCROLL FOR NEXT