Road Accident: नुवे चर्चजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक; उपचारादरम्यान एकाचा मृत्यू, दुसरा जखमी

Nuvem Road Accident: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी १०.३० वा.च्या सुमारास आंतोनियो हे होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटरने जात होते.
Nuvem Road Accident
Road AccidentDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: नुवे चर्चजवळ गुरुवारी सकाळी दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात आंतोनियो रॉड्रिग्ज (रा. नुवे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर गिरीश कारेकर हे जखमी झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी १०.३० वा.च्या सुमारास आंतोनियो हे होंडा अ‍ॅक्टिव्हा स्कूटरने जात होते. नुवे चर्चजवळ वेर्णाच्या दिशेने जाण्यासाठी त्यांनी उजवीकडे यू-टर्न घेतला. यावेळी नुवेकडून वेर्णाच्या दिशेने जाणाऱ्या गिरीश कारेकर यांच्या हिरो माएस्ट्रो स्कूटरला त्यांच्या दुचाकीची धडक बसली.

Nuvem Road Accident
Goa Dairy Employees: गोवा डेअरी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला खासदार विरियातो फर्नांडिस यांचा पाठिंबा; सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

दोघेही रस्त्यावर पडून जखमी झाले. आंतोनियो यांना दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, उपनिरीक्षक नारायण पिंगे तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.