Illegal stalls deleted Dainik Gomantak
गोवा

Murgaon Municipality: वरुणापूरी येथील बेकायदेशीर गाडे पालिकेने हटवले

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही कारवाई चालूच राहणार- लिओ रॉड्रीग्रीस, नगराध्यक्ष

गोमन्तक डिजिटल टीम

Murgaon Municipality वरुणापूरी राष्ट्रीय महामार्गावरील बेकायदेशीर गाड्यावर मुरगाव पालिकेने नगराध्यक्ष लिओ रॉड्रिगीस यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करून तीन गाडे जप्त केले. ही कारवाई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार चालूच राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष लिओ रॉड्रीग्रीस यांनी दिली.

वरुणापुरी मुख्य नाक्यावर बिगर गोमंतकीयांनी राष्ट्रीय महामार्गावर बेकायदेशीर गाडे उभारून आपला व्यवसाय थाटला असून पालिकेच्या आदेशाला धुडकावन सदर बिगर गोमंतकीय आपला व्यवसाय तेजीत चालवतात.

Illegal stalls deleted

यापूर्वी पालिकेने कित्येक वेळा कारवाई केली असली तरी पुन्हा येरे माझ्या मागल्याची भूमिका सदर बोकायदेशीर गाडे धारक घेत आहेत. मांगूरहिल वरुणापूरी हा मुख्य जंक्शन असून याठिकाणी सकाळ संध्याकाळ लोकांची तसेच वाहनांची वर्दळ असते. सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत या ठिकाणी विविध ठिकाणी रोजंदारीवर कामाला जाणाऱ्या कामगारांची गर्दी असते, नंतर संध्याकाळचेही असेच चित्र असते.

हे गाडे मुख्य राष्ट्रीय महामार्गावर उभे असल्याने सदर कामगार लोक तंबाखूजन्य पदार्थ तसेच इतर खाद्यपदार्थ घेण्यासाठी या बेकायदेशीर गाड्यावर गर्दी करतात. त्यामुळे एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Illegal stalls deleted

गेल्या महिन्यात एका महिलेला याठिकाणी अपघात होऊन आपला जीव गमवावा लागला होता. तसेच लहान मोठ्या अपघातांचा सिलसिला येथे चालूच आहे. गाडे जरी लहान असले तरी याठिकाणी अंमली पदार्थ विक्री केंद्र तसेच जुगार अड्डा बिगर गोमंतकीय चालवतात अशी माहिती प्राप्त झाली होती.

या बेकायदेशीर कृत्यावर नियंत्रण नसल्याने यात वाढ झालेली पाहण्यात आली आहे. वारंवार पालिकेकडे तक्रारी करून काही उपयोग होत नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान उच्च न्यायालयाने सदर राष्ट्रीय महामार्गाकडे थाटलेले बेकायदेशीर गाडे हटविण्याचा आदेश पालिकेला दिला होता. मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती.

तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, वास्को वाहतूक पोलिसांनीही पालिकेला या गाड्यावर कारवाई करण्यास वारंवार सुचविले असता आज दोन महिन्यानंतर पुन्हा एकदा पालिकेने या गाड्यावर कारवाई करून तीन गाडेजप्त केले.

यावेळी गाडेधारकांनी पालिका नगराध्यक्ष व अधिका-यांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला असता पोलिस निरीक्षक कपिल नायक आपल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी येऊन त्यांनी गाडेधारकांनी हुसकावून लावले व पालिकेला गाडेजप्त करण्यास मदत केली.

या ठिकाणी पुन्हा गाडे उभारल्यास कडक कारवाईला सामोरे जाण्यास तयार रहा असा इशारा त्यांनी यावेळी बेकायदेशीर बिगर गोमंतकीय गाडेधारकांना दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT