रक्ताच्या आजारांपासून बचावाला 300 पेक्षा जास्‍त ‘स्टेमसेल दाता’

डीकेएमएस बीएमएसटी या फाऊंडेशन इंडियाने घेतला पुढाकार
Stem Cell Donors
Stem Cell DonorsDainik Gomantak

रक्ताच्या आजारापासून उद्‌भवलेल्‍या व्याधीतून दर पाच मिनिटांनी एका रुग्णाचा मृत्यू होतो. विशेषतः रक्ताचा कर्करोग, थेलेसेमिया किंवा अप्लास्टिक ॲनिमिया असलेल्या व्यक्तीला धोका असतो. अशा रुग्णांना जीवदान देण्यासाठी डीकेएमएस बीएमएसटी या फाऊंडेशन इंडियाने पुढाकार घेतला आहे.

रक्तातील स्टेमसेल अशा रुग्णांना दान करून त्‍यांना जीवदान देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. फर्मागुढी-फोंडा येथे यासंबंधीची जागृती मोहीम आआयटी गोवा फेस्तमध्ये शनिवारी राबविण्‍यात आली. या गोवा फेस्तमध्ये तीनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी स्टेम सेलदाते म्हणून स्वतःची नोंदणी केली.

Stem Cell Donors
Panaji : सरकार आमच्या संयमाचा अंत पाहतेय का? पणजीकरांचा सवाल

यासंबंधीची माहिती फर्मागुढीतील एका कार्यक्रमात डीकेएमएस बीएमएसटी फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी पत्रकारांना दिली. रक्ताचा रोग असलेल्या रुग्णांना अशा स्टेमसेल दानातून जीवदान देणे शक्य असल्याने त्यासंबंधीची जागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे.

यावेळी तीनशेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी स्टेमसेल दाता म्हणून नोंद केल्याने आयोजकांनी समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

यावेळी डीकेएमएस बीएमएसटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॅट्रिक पॉल यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 18 ते 55 वर्षे वयोगटातील व्यक्ती स्टेमसेल दाता होऊ शकतो. यावेळी काही दात्यांनीही आपले विचार व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com