MLA Disqualification: आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणी तिसऱ्यांदा तहकूब

शुक्रवारी 17 मार्च रोजी सुनावणीत दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद होण्याची शक्यता
Hearing on MLA's disqualification petition will be held tomorrow
Hearing on MLA's disqualification petition will be held tomorrowDainik Gomantak

MLA Disqualification: आमदार दिगंबर कामत व आमदार मायकल लोबो यांच्याविरुद्ध काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दाखल केलेल्या आमदार अपात्रता याचिकेवरील सुनावणीवेळी प्रतिवाद्यांनी सभापतींकडे पुन्हा वेळ मागितल्याने ती तिसऱ्यांदा तहकूब करण्यात आली.

ही सुनावणी आता येत्या शुक्रवारी 17 मार्चला ठेवण्यात आली असून दोन्ही पक्षाकडून त्यावर युक्तिवाद होण्याची शक्यता आहे. ही अंतिम सुनावणी असण्याबाबत सभापतींनी कोणतेच भाष्य केले नाही.

Hearing on MLA's disqualification petition will be held tomorrow
CM Pramod Sawant: पर्यटकांनी कायदा हातात घेऊ नये, केवळ 100 नंबर डायल करावा...

ही याचिका आज सभापतींसमोर सुनावणीला आली तेव्हा याचिकादाराच्या वकिलांनी ही सुनावणी वारंवार तहकूब केल्याने त्याला उशीर होत आहे, त्यामुळे अधिक दिवस पुढे ढकलण्यात येऊ नये. पुढील सुनावणीची जवळची तारीख द्यावी अशी विनंती केली.

याचिकादार अमित पाटकर म्हणाले की, ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार तीन महिन्यात पूर्ण होण्याची गरज होती. ही याचिका जुलै महिन्यात सादर करण्यात आली होती व त्याला 8 महिने उलटून गेली तरी त्यावरील सुनावणी पूर्ण होत नाही याबाबत नाराजी व्यक्त केली.

या याचिकेवरील सुनावणी आज सोमवारी ठेवण्यात आली होती. याचिकादार व प्रतिवाद्यांचे वकील आज उपस्थित राहिले. प्रतिवाद्याच्या वकिलांनी ही सुनावणी तहकूब करण्याची विनंती केली. यावेळी याचिकादाराच्या वकिलांनी ही सुनावणी पुन्हा तहकूब करू नये अशी विनंती केली.

प्रतिवाद्यांना शेवटची संधी म्हणून ती तहकूब करण्यात आली. पुढील सुनावणीची तारीख याचिकादाराची विनंती लक्षात घेऊन या आठवड्यात ठेवण्यात आल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com