Traffic Rule Violation in Goa: दुचाकीवरून विनाहेलमेट चाललेल्या दोन तरूणांना गोवा पोलिसांनी नेहमीप्रमाणे अडवले. पण पोलिसांना पाहताच या तरूणांनी गाडी वेगाने पळवली.
त्यावर पोलिसांनी अत्यंत शिताफीने त्यांचा पाठलाग करत त्यांना अनमोड जंगलातून ताब्यात घेतले. ते दोघेही परप्रांतीय चोर असल्याचे पोलिसांच्या चौकशीत समोर आले आहे.
मोले येथे पोलिस नाकाबंदी करून तपासणी मोहिम राबवत होते. यावेळी प्लेजर या दुचाकीवरून (GA-09-J-3154) दोन तरूण येथे आले. ते मोलेच्या दिशेने आले आणि अनमोडच्या दिशेने चालले होते. दुचाकी चालवणाऱ्याने हेलमेट परिधान केले नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अडवले.
पण पोलिसांना पाहताच त्या तरूणांनी दुचाकी वेगाने पळवायला सुरूवात केली. पोलिसांनी हात दाखवूनही तरूणांनी या चौकातून सुसाट पळ काढला. त्यामुळे पोलिसांना संशय वाटला. पोलिसांनीही त्यांच्या गाडीवरून दुचाकीस्वाराचा पाठलाग सुरू केला.
दुचाकीस्वार अनमोडच्या दिशेने गेले. पोलिसांच्या भीतीने ते अत्यंत वेगाने आणि स्वतःसह दुसऱ्याला धोकादायक ठरू शकेल, अशा रितीने गाडी चालवत होते. अखेर पोलिसांनी त्यांना गाडीवरून गाठले. पोलिसांना जवळ आलेले पाहतात.
प्लेजर दुचाकीवरील या दोन तरूणांनी गाडी रस्त्याकडेला घेऊन गाडी सोडून थेट आणि त्यांनी अनमोड घाटाच्या जंगलाकडे पळत धाव घेतली.
पण पोलिसांनी त्यांचा पाठलाग सोडला नाही. त्यांच्या पाठोपाठ पोलिसही जंगलाच्या दिशेने गेले. पोलिस निरीक्षक कोल्लेम, पोलिस उपनिरीक्षक अजय धुरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जंगलात शोध घेत लपलेल्या या दोघांना शिताफीने पकडले.
त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांची दुचाकीदेखील चोरीची असल्याचे समोर आले. नुरअहमद हैदरसाल मुल्ला (वय २४, रा. हुबळी) आणि तैयब फारुख शेख (वय ३२, रा. हुबळी) अशी त्यांची नावे आहेत. ते दोघेही मुळचे हुबळी, कर्नाटक येथील रहिवासी आहेत. त्यांना चोरीप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.