Dhirio : दक्षिण गोव्‍यात पोलिसांचे डोळे बंद!

खुलेआम धीरयो : मागच्या पाच वर्षांत फक्‍त 42 घटनांची नोंद
Dhirio
Dhirio Dainik Gomantak
Published on
Updated on

वास्‍तविक दक्षिण गोव्‍यात दर आठवड्याला किमान तीन ते चार धिरयोंचे आयोजन केले जाते. खुलेआम या धीरयो लावल्‍या जातात. त्‍याची व्हॉट्‌सॲप ग्रुपवरून जाहिरातही केली जाते.

मात्र, गोवा पोलिसांना याचा थांगपत्ताही नाही, असे दिसून आले आहे. याचे कारण म्‍हणजे, 2018 पासून आतापर्यंत पोलिस दफ्‍तरी दक्षिण गोव्‍यात फक्‍त 42 धिरयोंचीच नोंद झाली असून या झुंजींसंदर्भात पोलिसांनी उच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशालाही पाने पुसली आहेत, हे स्‍पष्‍ट झाले आहे.

Dhirio
Goa Crime: वीज विभागातील कर्मचाऱ्याचा नदीत आढळला मृतदेह; मीराबाग-सावर्डेतील घटना

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या आदेशाप्रमाणे, गोव्‍यात रेड्यांच्‍या किंवा बैलांच्‍या झुंजी (धिरयो) लावणे बेकायदेशीर आहे. यासंदर्भात मुंबई उच्‍च न्‍यायालयानेही गोवा पोलिसांना निर्देश देताना, अशा धिरयो आयोजित झाल्‍यास त्‍यासाठी स्‍थानिक पोलिस निरीक्षकाला जबाबदार धरण्‍यात येईल, असा इशारा दिला होता. असे असतानाही या धिरयो अजूनही खुलेआम चालू असून पोलिस त्‍याकडे सर्रास कानाडाेळा करत आहेत.

मिळत असलेल्‍या माहितीप्रमाणे, पोलिस दफ्‍तरी ज्‍या ४२ धिरयाेंची नोंद झाली आहे. त्‍यातील ३९ धिरयाे सासष्‍टी तालुक्‍यात नोंद झाल्‍या असून अन्‍य तीन धिरयो वेर्णा पोलिस स्‍थानकाच्‍या अखत्‍यारित नोंद झाल्‍या आहेत. मागच्‍या महिन्‍यात तळावली-नावेली येथे अशाच एका धिरयाेत एक बैल जखमी झाल्‍याने दक्षिण गोव्‍यातील धिरयाेंचा मुद्दा ऐरणीवर आला होता.

Dhirio
Job Scam In Goa : नौदलातील शिक्षिकेचा गोव्यातील अनेक युवकांना लाखोंचा गंडा

"गोव्‍यात या बेकायदेशीर धिरयोंचे आयोजन हे राजकीय आशीर्वादानेच होत असल्‍याने पोलिस या प्रकाराकडे सर्रास दुर्लक्ष करतात. वास्‍तविक पोलिसांनी त्‍या बंद कराव्‍यात, असा आदेश न्‍यायालयाने दिला असतानाही त्‍या आदेशाचे पालन केले जात नाही, ही अत्‍यंत दुर्दैवाची बाब आहे. पोलिसांच्‍या निष्क्रियतेमुळेच गोव्‍यात हा बेकायदेशीरपणा वाढला आहे."

- नॉर्मा आल्‍वारिस, धिरयो विरोधी याचिकादार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com