Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: टँकर व व्यापारी वाहनांकडून सरकारला कोणताही महसूल नाही- अमित पाटकर

काँग्रेसचे निवेदन : अपघातांवर नियंत्रणासाठी वाहतूक खात्याने सक्रिय व्हावे

Ganeshprasad Gogate

Goa Congress गोव्यातील टॅंकर तसेच इतर व्यापारी वाहनांकडून वाहतूक विभागाला कोणताच महसूल मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गोव्यात व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांचा कोणताही डेटा परिवहन विभागाकडे नसल्याचे कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे.

यावरून भाजप सरकार राज्याला शून्य महसूल देणाऱ्या टँकर आणि व्यावसायिक वाहन माफियांना प्रोत्साहन देत आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.

सांडपाणी वाहतूक करणाऱ्या पाण्याच्या टँकरवर कारवाई करण्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याबद्दल काँग्रेस पक्षाने आज वाहतूक खात्यात घुसून संचालक राजन सातार्डेकर यांची खरडपट्टी काढली.

राज्यातील वाढत्या जीवघेण्या अपघातांबाबतही त्यांना जाब विचारला. गोव्यातील बेकायदेशीर टँकर चालवणाऱ्यांवर कारवाई करणे आणि रस्ते अपघातांवर नियंत्रण ठेवण्याच्या मागणीसाठी परिवहन संचालकांना दोन निवेदने देण्यात आली.

काँग्रेसच्या शिष्टमंडळात अमरनाथ पणजीकर, एव्हर्सन वालीस, मनीषा उसगावकर, अर्चित नाईक, जॉन नाझारेथ, विजय भिके, विवेक डिसिल्वा, सुदिन नाईक आदींचा समावेश होता.

सरकारला होत असलेल्या मोठ्या प्रमाणातील महसुलाचे नुकसान तसेच राज्यातील टँकर माफियांच्या कारवाया यांची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय चौकशीची मागणी आम्ही पुन्हा एकदा करतो, अशी मागणी अमित पाटकर यांनी केली.

गोवा विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरावरून गोव्यात व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या केवळ 26 दुचाकी आहेत, असे नमूद केले आहे. याचा अर्थ सरकारला व्यावसायिक कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रक, पिकअप, रिक्षा तसेच इतर वाहनांकडून महसूल मिळत नसल्याचे स्पष्ट होते.

- अमित पाटकर, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष

दबावानंतर कारवाई

सांडपाणी वाहतूक करताना नागरिकांनी पकडलेल्या पाण्याच्या टँकरवर त्यांच्या विभागाने कोणतीही कारवाई केली नसल्याचे परिवहन संचालकांनी स्पष्टपणे मान्य केले. आम्ही दबाव आणल्यानंतर त्यांनी आता कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे, असे अमित पाटकर यांनी सांगितले.

गोव्यातील अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारकडे कोणतीही कृतियोजना नाही. अपघातांवर नियंत्रणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सिग्नल सुरू करणार असल्याचे वाहतूक संचालकांनी सांगितले.

मेरशी जंक्शनवर लावलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिग्नलचे तीनतेरा वाजले आहेत. या सिग्नलमुळे जंक्शनवर गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे, असे पाटकर यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: बेपत्ता राजवीर सापडला; काणका पर्रा येथे लागला शोध

Saint Xavier Exposition: मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूताने घेतले संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाचे दर्शन; गोव्याचे केले विशेष कौतुक

Cash For Job: संशयितांच्या मालमत्तेची चौकशी करा! पोलिसांची शिफारस; कोट्यवधींची अफ़रातफर उलगडणार?

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT