Valpoi News: डबल इंजिन सरकारमुळे विकासकामे मार्गी- दिव्या राणे

पर्ये मतदारसंघात साडेचार कोटी खर्चून विविध कामांना प्रारंभ
Valpoi News
Valpoi NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पर्ये मतदारसंघात विकासाचा झपाटा सुरूच असून सर्व रखडलेल्या विकास कामांना प्राधान्य देऊन लवकरात लवकर पूर्ण केली जाणार आहेत. राज्य सरकार व डबल इंजिन सरकारमुळे सर्व विकासकामांना गती मिळत आहे.

त्यामुळे सत्तरीचा सर्वांगीण विकास हेच आपले ध्येय आहे, असे प्रतिपादन पर्ये आमदार डाॅ. दिव्या राणे यांनी म्हाऊस पंचायत क्षेत्रातील अंतर्गत रस्त्याच्या हाॅटमिक्स डांबरीकरण कामाच्या शुभारंभ कार्यक्रमात बोलताना केले.

ठाणे डोंगुर्ली पंचायत क्षेत्रातील हिवरे, चरावणे, रिवे आदी भागातील 6 वाड्यावरील अंतर्गत रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण व रस्त्याचे रुंदीकरण कामाचाही यावेळी शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर पर्ये येथे संरक्षक भिंतीच्या कामाचे आमदारांच्या हस्ते उद्‍घाटन करण्यात आले.

Valpoi News
'SCO बैठकीसाठी गोव्याला जातोय'... बिलावल भुत्तोंनी भारतात येण्यापूर्वी व्हिडिओद्वारे दिला महत्वाचा मेसेज

राणे म्हणाल्या, म्हाऊस पंचायतीत एकूण 6 किमी रस्त्याचे हाॅटमिक्स डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे म्हाऊस ते झर्मे रस्ता गुळगुळीत होणार आहे. आपण निवडणुकीपूर्वी दिलेली सर्व आश्वासने वेळेत पूर्ण करणार आहे.

म्हाऊस येथे झालेल्या हाॅटमिक्स डांबरीकरण कामाच्या शुभारंभ कार्यक्रमात उपसरपंच राधिकी सावंत, पंच प्रीती गावकर, सुलक्षा देसाई, क्रांता गावस, गुरुदास गावस, सयाजी सावंत, केरी जिल्हा पंचायत सदस्य देवयानी गावस, अभियंता तांबोस्कर, अरविंद सावईकर, देवेंद्र वेलिंगकर व इतरांची उपस्थिती होती.

Valpoi News
Vasco News: रेल्वेस्थानकासमोर विक्रेत्यांचे अतिक्रमण, नगरपालिकेची बघ्याची भूमिका

तर ठाणे पंचायतीत झालेल्या रस्ता कामाच्या उद्‍घाटन सोहळ्यात सरपंच सरिता गावकर, अनिष्का गावस, सुरेश आयकर, तनया गावकर, विनायक गावस, नीलेश परवार, सर्वेश गावकर, उत्तम गावकर, सुभाष गावडे, अभियंता तामोस्कर, अरविंद सावईकर, देवेंद्र वेलिंगकर, चंदन नाईक आदींची उपस्थिती होती.

वाळवंटी नदी काठी संरक्षक भिंत उभारणी

पर्ये येथे कार्यक्रमात डाॅ. राणे म्हणाल्या, वाळवंटी नदीच्या संरक्षक भिंतीच्या बांधकामाचे काम हाती घेण्यात येत आहे. एकूण 86 लाख रुपये खर्च येणार असून नदीच्या दोन्ही बाजूने संरक्षण भिंत बांधली जाणार आहे.

या कामामुळे पावसाळ्यात वाळवंटीतून वर येणाऱ्या पाण्यामुळे मोठी अडचण निर्माण होत होती,ती दूर होणार आहे. तसेच नगरगाव पंचायत ५ कोटी रुपये खर्चून रस्त्याचे हाॅटमिक्स डांबरीकरण करणार येणार आहे.त्यामुळे नागरिकांची चांगली सोय होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com