‘आयसीएआर’ करतेय गोमंतकीय जातींच्या आंब्यांचे संगोपन

स्‍तुत्‍य उपक्रम : मानकुराद आंबा ठरतोय गोव्यातील पारंपरिक जातीच्या आंब्यांहून वरचढ
Mango
Mango Dainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यातील आंबा हे फळ केवळ एक फळ नसून गोवावासीयांसाठी एक भावना आहे. गोव्यातील लोकांनी त्यांच्या आंब्याचे गोड फळ चाखण्याची संधी कधीही सोडली नाही. गोव्यात आंब्याच्या 70 पेक्षा जास्त जाती फार पूर्वीपासून पिकवल्या जात होत्या.

गोवेकर हे आंबे खाणारे आहेत आणि गोव्याच्या पारंपरिक घराजवळ किमान एक आंब्याचे झाड सापडेल. पण वरवर पाहता, आंब्याच्या या स्थानिक जाती कमी होत चालल्या आहेत कारण लोक फक्त मानकुराद आणि हापूस खरेदी करत आहेत असे गोव्याचे शेती विशेषज्ञ सांगतात.

Mango
Ponda-Sanquelim Municipal Election 2023: फोंडा, साखळी पालिकांवर भाजपचाच झेंडा- तानावडे

गोव्यात चांगल्या दर्जाच्या आंब्याला खूप मागणी आहे. काही वर्षांपूर्वी गोव्याच्या बाजारपेठा फर्नांडिन, बिशप, अाफोन्सो आणि इतर आंब्यांच्या विविधतेने भरून जायच्या. परंतु अलीकडे हे वाण बाजारात मिळणे कठीण आहे कारण मानकुराड जातीच्या आंब्याला मोठी मागणी आहे.

म्हापसा येथील शेती विशेषज्ञ मिगुएल ब्रागांझा यांनी सांगितले की, गोव्यातील आंब्याबद्दलचे प्रेम इतके होते की काही ख्रिश्चन कुटुंबांनी त्यांच्या जागेत वाढलेल्या आंब्याच्या झाडाला त्यांचे आडनाव दिले.

असेच एक उदाहरण ब्रागांझाने दिलेले म्हापसा, येथील एका कुटुंबाचे होते ज्यांचे आडनाव कार्डोझो आहे. ज्यांचे आडनाव आंब्याच्या झाडाला देण्यात आले होते आणि ते नंतर आयसीएआर द्वारे नोंदणीकृत झाले.

Mango
'SCO बैठकीसाठी गोव्याला जातोय'... बिलावल भुत्तोंनी भारतात येण्यापूर्वी व्हिडिओद्वारे दिला महत्वाचा मेसेज

नंतर गोव्याच्या बाजारपेठेत हे गोवन जातीचे आंबे का उपलब्ध नाहीत, असे विचारले असता, ब्रागांझा म्हणाले की, आजकाल मानकुराद जातीचा आंबा हा आंब्याचा समानार्थी बनला आहे. याचे कारण असे की आंब्याच्या इतर जाती पिकल्यानंतर काही दिवसांनी वेगळी चव देतात, तर मानकुराद जातीची चव खराब होईपर्यंत तशीच राहते.

त्यांनी पुढे माहिती दिली की जरी आयसीएआर सारख्या काही संस्था आहेत ज्यांनी स्थानिक शेतकर्‍यांना त्यांची रोपे वितरीत करून या गोवन जातीच्या आंब्याचे पुनरुज्जीवन आणि त्यांच्या संगोपनासाठी पुढे आले आहे.

आयसीएआरमधील काही शास्त्रज्ञांनी खऱ्या अर्थाने या जातींचे संरक्षण करण्यासाठी काम केले आहे आणि ते विविध आंब्यांच्या जातीची रोपटी, वाळपई, साळ आणि इतर ठिकाणच्या शेतकऱ्यांना दिली आहेत. निरंकाल येथील शेतकरी रजत प्रभू यांनीही गोवा जातीच्या आंब्याची कलमे आणि रोपे लावण्यात हात आजमावला आहे.

Mango
Valpoi News: डबल इंजिन सरकारमुळे विकासकामे मार्गी- दिव्या राणे

अन्‍य खाद्यपदार्थ तयार करण्‍यासाठीही केला जातोय वापर

गोव्यातील आयसीएआरचे शास्त्रज्ञ डॉ. ए.आर. देसाई यांनी या स्थानिक गोव्याच्या आंब्याच्या जाती कमी का राहतात याची काही कारणे सांगितली.

डॉ. देसाई म्हणाले की, मानकुराद, हिलारियो, मुसरत, फर्नांडिन या जातींचे आंबे गुणवत्ता आणि उपलब्धतेमुळे अधिक किंमत देतात. तर आंब्याच्या इतर जातींचा वापर लोणचे, जाम तयार करणे, कच्चा आंबा भरणे, सासव सारखे गोड पदार्थ बनवणे इत्यादीसाठी केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com