Hearing on MLA's disqualification petition will be held tomorrow Dainik Gomantak
गोवा

MLA Disqualification Petition : अपात्रता याचिकेचा अधिकार फक्त आमदारालाच!

कामत व लोबो यांचे उत्तर

दैनिक गोमन्तक डिजिटल

एखाद्या आमदाराविरोधात आमदार अपात्रता याचिका दुसरा आमदारच दाखल करू शकतो, असे उत्तर मडगावचे आमदार दिगंबर कामत आणि कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी सभापतींसमोर दाखल केलेल्या याचिकेतील नोटिशीला दिले आहे. त्यामुळे ही याचिका फेटाळावी, अशी विनंती त्यांनी सभापतींना केली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी सादर केलेल्या याचिकेवरील सुनावणी सध्या सभापतींसमोर सुरू झाली असून ती आता 6 मार्चला ठेवण्यात आली आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी पक्षविरोधी कारवायांसाठी आमदार दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांच्याविरुद्ध सभापतींसमोर याचिका सादर करून त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. त्यावेळी ते काँग्रेसमध्येच होते.

ही याचिका सादर झाल्यानंतर काँग्रेसमधील आठजणांचा गट फुटून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे फुटीर नियम 1986 नुसार अपात्रतेसाठी अर्ज आमदारच दुसऱ्या आमदाराविरुद्ध याचिका दाखल करू शकतो.

या प्रकरणात ती पक्षाच्या अध्यक्षांनी केली आहे. या मुद्यावरच ती फेटाळली जावी, अशी विनंती कामत, लोबो यांनी केली आहे. चोडणकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी येत्या 10 मार्चला ठेवण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: जपान आणि अमेरिकेच्या काही भागात स्थलांतराचा इशारा

Illegal Liquor Goa: सासष्‍टीत सर्वाधिक बेकायदा दारू धंदा! 5 वर्षांत 1395 प्रकरणे नोंद; नव्‍याने 2365 परवाने

Goa Crime: धमकी, खून - अत्याचाराचा प्रयत्न! आरोपीला 10 वर्षांचा कारावास; फास्ट ट्रॅक न्यायालयाचा निवाडा

Javier Siverio: 'हमखास गोल नोंदविणारा खेळाडू'! स्पॅनिश हावियर FC Goa टीममध्ये; प्रशिक्षक मार्केझनी केले कौतुक

Goa Third District: 'तिसऱ्या जिल्ह्यात काणकोण नकोच! निर्णय लादल्यास रस्त्यावर उतरणार'; स्थानिक आक्रमक

SCROLL FOR NEXT