Surya Namaskar Easy Tips: सूर्यनमस्कार करण्यापूर्वी 'असा' सराव करणे गरजेचे

सर्यनमस्कार केल्याने संपुर्ण शरीराचा व्यायाम होतो.
Surya Namaskar Easy Tips
Surya Namaskar Easy TipsDainik Gomantak
Published on
Updated on

संध्याच्या धावपळीच्या काळात आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळेच शरीरात जडपणा वाढू लागला आहे. तुम्ही जर नियमितपणे सूर्यनमस्कार केला तर खुप फायदा होउ शकतो. कारण जर तुम्हाला सूर्यनमस्काराची सुरुवात करायची असेल तर तुम्ही आधी सोप्या सोप्या आसनांने सुरुवात करावी. शरीराला लवचिक बनविण्यासाठी काय केलं पाहिजे हे जाणून घेउया.

  • ध्यान करावे

सूर्यनमस्कार करण्यापूर्वी पद्मासनात चटईवर बसावे आणि दोन्ही हात एकमेकांना जोडून वर करा. तुमचे शरीर वरच्या दिशेने खेचा आणि 20 सेकंद धरून ठेवा. यानंतर, हात खाली करा आणि आराम करा. यानंतर डोळे बंद करून काही वेळ ध्यान करा. असे केल्याने मन आणि शरीर दोन्ही आसनासाठी तयार होतील.
 
सर्वप्रथम पाय समोर उघडे ठेवून पाय हलवा. आता दोन पायांमध्ये थोडेसे अंतर करा आणि मोजून पाय आत आणि बाहेरून हलवा.
 

आता तुमच्या पायाची बोटे एकदा आत आणि बाहेर पसरवा. हे सुमारे 10 सेकंदांसाठी करा.

यानंतर, तुमचे पंजे घड्याळाच्या दिशेने फिरवा. प्रथम त्यांना डावीकडून आणि नंतर उजव्या बाजूने फिरवा. असं 10 वेळा करा.

आता आसन फुलपाखरासारखे करा. पायाची बोटे एकत्र जोडून खाली बसा. आपल्या हातांनी पंजे घट्ट पकडा.

आता तुमचे गुडघे उचला आणि जमिनीवर ठेवा. हे 1 मिनिट करा.

Surya Namaskar Easy Tips
Relationship Tips : तुमचा पार्टनर तुम्हाला धोका तर देत नाहीय ना? वाचा..
  • सुर्य नमस्कार केल्याने आपले आरोग्य नेहमी उत्तम राहत असते.

  • आपल्याला कधीही कुठला विकार जडत नाही.

  • ज्या लोकांना लठठपणाचा त्रास जाणवत असेल त्यांनी जर नियमितपणे सुर्यनमस्कार केला तर त्यांची पोटाची चरबी देखील कमी होण्यास मदत होते.

  • जर आपण रोज सुर्यनमस्कार केला तर आपल्या पचन क्रियामध्ये देखील चांगली सुधारणा होऊ लागते ज्यांना बदधकोष्ठतेचा आणि अपचनाचा त्रास जाणवत असेल अशा व्यक्तींसाठी सुर्यनमस्कार करणे अत्यंत फायदेशीर ठरत असते.

  • जे व्यक्ती नियमितपणे सुर्यनमस्कार करतात त्यांचे शरीर लवचिक बनते.

  • जे व्यक्ती नियमित सुर्यनमस्कार करतात ते नेहमी तरुण दिसत असतात आणि त्यांच्या चेहरयावर देखील एक तेज उत्साह तसेच चमक दिसुन येत असते.

  • जे व्यक्ती नियमित रोज सकाळी सुर्यनमस्कार करत असतात त्यांची स्मरणशक्ती देखील चांगली राहत असते.

  • जर आपण नियमित सुर्यनमस्कार केला तर आपली सर्व ताणतणाव चिंता दुर होत असते.आणि आपणास एकदम शांत आणि हलके वाटु लागते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com