Drama Competition Dainik Gomantak
गोवा

Margao News: कोकणी हौशी नाट्यस्पर्धेत 'या' नाटकाने मारली प्रथम क्रमांकाची बाजी

‘भांगराळें गोंय अस्मिताय’तर्फे आयोजन

गोमन्तक डिजिटल टीम

Drama Competition मडगावच्या ‘भांगराळें गोंय अस्मिताय’ या संस्थेने 1 फेब्रुवारी ते 30 एप्रिल या कालावधीत आयोजित केलेल्या चौथ्या सुमती रामा नाईक स्मृती उत्सवी हौशी कोकणी नाट्यस्पर्धेचा निकाल आज रविवारी जाहीर करण्यात आला.

मासोर्डे-वाळपई येथील कला आविष्कारतर्फे सादर करण्‍यात आलेल्‍या ‘धनयां देंवचारा’ या नाटकाला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला.

स्‍पर्धेतील दुसरे बक्षीस दाग-फोंडा येथील श्री सरस्वती नाट्यमंडळाच्‍या ‘रथोत्सव’ला तर तिसरे बक्षीस आके-मडगाव येथील श्री राम साई हौशी कला मंडळाच्‍या ‘ओ बाय’ नाटकाला प्राप्‍त झाले.

उत्तेजनार्थ बक्षिसे साखळी श्री विठ्ठल मंचच्‍या ‘धनयां देवचारा’, केरी-सत्तरी बेळेवंश युवक समितीच्‍या ‘देवा तूं पाव’ व सांतईनेज-पणजीच्‍या वाठारेश्र्वर महिला नाट्यमंडळाच्‍या ‘ आंगश्यो मांगश्यो’ नाटकाला प्राप्‍त झाली. स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे आहे.

उत्कृष्ट विनोदी भूमिकी : उमेश बांदोडकर (मोग करुया मोग), उत्कृष्ट बालकलाकार : साईराज मडकईकर (सुंवारी), प्रथमेश सावंत (धनयां देंवचारा), उत्कृष्ट नाट्यसंहिता : आमकां टायम ना (लेखक : सर्वेश नाईक), उत्कृष्ट पार्श्र्वसंगीत : सागर गावस (देवा तू पाव), उत्कृष्‍ट नेपथ्य : कुंदन च्यारी (धनयां देंवचारा), उत्कृष्ट वेशभूषा : पुंडलिक गावस (धनयां देंवचारा), उत्कृष्ट प्रकाशयोजना : तुळशीदास नाईक (धनयां देंवचारा), उत्कृष्ट कोकणी नांदी : (शुभ मंगल धांव धांव), उत्कृष्ट आयोजक गाव (ओ बाय - श्री राम साई हौशी कला मंडळ आके-मडगाव).

स्पर्धेचे परीक्षण प्रसाद पागी, सूरज कोमरपंत व उदय गुडे यांनी केले. या स्पर्धेत एकूण १८ नाट्यमंडळांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे संयोजक सूरज कोमरपंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्‍पर्धेचा निकाल जाहीर केला.

यावेळी सहसंयोजक उदय गुडे, ‘भांगराळे गोंय अस्मिताय’चे अध्यक्ष राजेश प्रभू, डॉ. पूर्णानंद च्यारी, सुहास वेर्णेकर, पंकज नमशीकर, पंढरीनाथ परब, प्रसाद पागी, एकनाथ मराठे, दिलीप नायक आणि पदाधिकारी उपस्थित होते.

स्पर्धेतील विजेत्यांना ३ जून रोजी मडगाव रवींद्र भवनात आयोजित कार्यक्रमात बक्षिसे प्रदान केली जातील.

उत्कृष्ट दिग्दर्शक : विनय गावस (धनयां देंवचारा), दीपराज खेडेकर (रथोत्सव), संदीप मडिवळकर (ओ बाय).

उत्कृष्ट अभिनय (पुरुष) : राजेंद्र च्यारी (रथोत्सव), साहिल नाईक (ओ बाय). प्रशस्‍तिपत्रक : नंदा सावळ (धनयां देंवचारा), दीपराज नाईक (आमकां टायम ना), प्रकाश पाळणी (रुम मचाये धूम), शिवाजी ओझरेकर (सुशेगाद डॉट कॉम), नीलेश मडकईकर (सुंवारी), राधाकृष्ण बांबोळकर (शुभमंगल धांव धांव), विभव गावडे (फिर भी दिल है मर्दोवाला), सर्वेश ठाणेकर (हरी आमचो टेंपररी).

उत्‍कृष्‍ट अभिनय (स्त्री) : प्रियांकी कारापूरकर (ओ बाय), सेजल शेट्ये (आंगश्यो मांगश्यो), प्रशस्‍तिपत्रक : समिरा वझरकर (आमी ना कमी), स्वाती शिरसाट (आमकां टायम ना), निकिता गावस (देवा तूं पाव), वृषाली कांदोळकर (आकू आमचें डाकू), आरती शिरोडकर (आकू आमचें डाकू), स्नेहा केरकर (आकू आमचें डाकू), सलोनी हळदणकर (आमी ना कमी), नेहा गावस (हरी आमचो टेंपररी).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Trump Tariffs on India: वाढीव आयात शुल्काचे भारतावर घोंघावतेय विघ्न, 50 टक्के भार; दागिने उद्योगावर परिणाम

Vasco: मुरगाव बंदरामध्ये बार्जला जलसमाधी, आठजण बचावले; जहाजाच्या अवशेषांना धडकून अपघात

World Chess Championship 2025: 23 वर्षांनंतर 'विश्वकरंडक बुद्धिबळ' स्पर्धा गोव्यात रंगणार, 30 ऑक्टोबरपासून जगभरातील 206 खेळाडूंत चुरस

Ganesh Festival 2025: चराचरांत आनंदपर्वाची अनुभूती, विघ्नहर्त्याच्या स्वागताला गोमंतकीय सज्ज; सार्वजनिक मंडळेही गजबजली

Rashi Bhavishya 27 August 2025:कामात सकारात्मक बदल, महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला; जाणून घ्या तुमच्या राशीचे भविष्य

SCROLL FOR NEXT