Cannes Film Festival 2023: ‘कान्स’ मध्ये 54 व्या ‘इफ्फी’चे पोस्टर होणार प्रदर्शित

उद्या उद्‍घाटन : ऑस्कर विजेती निर्माती गुनीत मोंगा, अभिनेत्री मानुषी छिल्लर ‘रेड कार्पेट’वर
Film Festival
Film FestivalGomantak Digital Team

Cannes Film Festival 2023: कान्स येथे 16 ते 27 मे या कालावधीत होणाऱ्या चित्रपट महोत्सवात 54 व्या ‘इफ्फी’चे पोस्टर प्रदर्शित होत आहे.

केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यंदाच्या कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत.

उद्‍घाटनादिवशी ‘रेड कार्पेट’वर डॉ. मुरुगन यांच्यासोबत ‘द एलिफंट व्हिस्परर्स’च्या निर्मात्या गुनीत मोंगा,  अभिनेत्री,  मॉडेल तथा  2017 च्या मिस वर्ल्ड विजेत्या मानुषी छिल्लर,  अभिनेत्री ईशा गुप्ता व प्रसिद्ध मणिपुरी अभिनेता कंगाबम तोंबा - ज्यांचा नव्याने संचयित झालेला चित्रपट ‘इशानौ’  यंदा कान चित्रपट महोत्सवात क्लासिक विभागात प्रदर्शित होत आहे, हे सर्व रेड कार्पेटवर असतील.

Film Festival
Valpoi News: ‘आत्मा’अंतर्गत सत्तरीत नैसर्गिक मधमाशी पालनात क्रांती

इफ्फी 2020 मध्ये तरुण चित्रपट कलागुणांना वाव मिळावा यासाठी 75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’  या आधारे नव्या सत्राची सुरुवात झाली आहे, ज्यामुळे इफ्फीची यशोगाथा प्रदर्शित होईल आणि त्यातून इफ्फी साठी अधिक सहकार्य मिळण्यास मदत मिळेल. कान्स हे भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांसाठी नेहमीच खास राहिले आहे.

गेल्या वर्षी,  मार्चे डू कान्समध्ये भारताला ‘कंट्री ऑफ ऑनर’ हा सन्मान देण्यात आला होता. आता यंदाच्या ऑस्कर मध्ये ‘आरआरआर’  या चित्रपटाने आधीच जगाला,‘नाटू नाटू’ वर नृत्य करायला भाग पाडले आहे, तर द एलिफंट व्हिस्परर्सने शॉर्ट फिल्म विभागात ऑस्कर जिंकून भारतीय कथांची वाढती पोहोच दाखवली आहे.

Film Festival
Santa Cruz Electricity Issue: सांताक्रुझमध्ये विजेचा लंपडाव नित्याचा

‘आयपी’रचना सरस्वती यंत्राधारे

अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, यांच्या माध्यमातून जागतिक समुदायासमोर ‘शोकेसिंग इंडियाज क्रिएटिव्ह इकॉनॉमी’ संकल्पना घेऊन इंडिया पॅव्हेलियनची रचना केली जात आहे.

या पॅव्हेलियनची रचना ही सरस्वती यंत्राची प्रेरणा घेऊन केली आहे. ज्यात देवी सरस्वतीचे अमूर्त रूप, ज्ञान, संगीत, कला, विद्येची रक्षक अशी विविध रूपे दाखवली आहेत.

या मंडपाची छटा भारतीय राष्ट्रध्वजापासून प्रेरीत आहे. देशाच्या सामर्थ्यासाठी केशरी, आंतरिक शांती व सत्यासाठी पांढरा, भूमीची सुपीकता हिरवा तसेच सत्याची प्रेरणा देणारा निळा, अशी रंगछटा वापरण्यात आली आहे.

Film Festival
World Family Day : कुटूंबाचं महत्त्व सांगणारे हे चित्रपट पाहिलेत का?...

‘आग्रा’सह चार भारतीय चित्रपट महोत्सवात

कान्स चित्रपट महोत्सवामध्ये चार भारतीय चित्रपटांची अधिकृत निवड झाली आहे. कनू बहल यांचा आग्रा;  हा त्यांचा दुसरा चित्रपट असेल, ज्याचा कान येथे डायरेक्टर्स फोर्टनाइट विभागात वर्ल्ड प्रीमियर होईल. 2014 सालचा पहिला चित्रपट तितली, अन सर्टेन रिगार्ड  विभागात प्रदर्शित झाला होता. अनुराग कश्यपचा केनेडी, हा चित्रपट मिडनाईट स्क्रिनिंग्ज व फेस्टिव्हल डी कानच्या ला सिने विभागात दाखवला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com