Arambol News: हरमल किनारी प्राथमिक सुविधांचे तीनतेरा, पर्यटन विभागाच्या भोंगळ कारभाराचा पर्यटकांना फटका

ऐन पर्यटन हंगामात प्रसाधनगृह प्रकल्प बारगळल्याने नागरिकांचा संताप
Arambol Beach
Arambol BeachDainik Gomantak
Published on
Updated on

Arambol News हरमल किनारी आता समुद्रस्नानासाठी गर्दी होत आहे. मे महिन्याच्या उत्तरार्धात लोक खाऱ्या पाण्याने आंघोळ करण्यासाठी समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी करतात. दरवर्षी शिरगावची श्री देवी लईराईची जत्रा आटोपली की ज्येष्ठ नागरिक ज्यांना संधीवाताचे दुखणे तसेच अन्य इजा असते ती मंडळी तीन, पाचवेळा स्नान उरकून घेतात.

हरमल किनाऱ्यावर प्रसाधनगृह किंवा चेंजिंग रुम नसल्याने महिलांची मात्र गैरसोय होत आहे. पर्यटन विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. या प्रश्‍नावर लोकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Arambol Beach
Calangute Electricity Shortage: कळंगुट भागात विजेचा खेळखंडोबा; लोक संतप्त

यासदंर्भात, पेडणे येथील नागरिक नीळकंठ परब म्हणाले की, आता जमाना बदलला असून गेस्ट हाउस संस्कृती विकसित झाली आहे. हजारो रुपये खर्च करुन रुम बुक केल्या जातात. मात्र किनाऱ्यावर नागरिकांसाठी प्रसाधनगृह किंवा चेंजिग रुम असल्या तर महिलांसाठी ते सोयीचे ठरेल.

मात्र कपडे बदलण्यासाठी सोय नसल्याने होडी ठेवण्यासाठीच्या झोपड्यात महिलांना कपडे बदलावे लागतात. प्रत्येक किनाऱ्यावर आता चेजिंग रुमची मागणी वाढत आहे.

Arambol Beach
Valpoi News: ‘आत्मा’अंतर्गत सत्तरीत नैसर्गिक मधमाशी पालनात क्रांती

प्रसाधनगृह उभारा

हरमल भागात एक कोटी रुपये खर्चून प्रसाधनगृह बांधण्याचा प्रस्ताव ठेवला होता. याबाबत त्यात कमिशन किती असेल अशी लोकांमध्ये चर्चा रंगली होती. मात्र, हा प्रकल्प बारगळल्यामुळे जनतेचे पैसे वाचले, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

तरी मांद्रे मतदारसंघाचे आमदार गीत आरोलकर यांनी पर्यटन खात्यामार्फत ठोस भूमिका घेऊन प्रसाधनगृहाची सुविधा उभारावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com