Canacona IT Project  Dainik Gomantak
गोवा

काणकोणात होणारा आयआयटी प्रकल्प जवळपास निश्‍चित

सभापतींनी दिले संकेत : कोमुनिदाद जमीन देण्‍यास तयार

दैनिक गोमन्तक

काणकोण: काणकोणात आयआयटी प्रकल्प होणार हे आता जवळपास निश्‍चित झाले आहे. या प्रकल्पाला प्राधान्य देण्यात येईल असे सांगून सभापती रमेश तवडकर यांनी आज ‘व्हिजन काणकोण’ कार्यक्रमात त्‍यावर शिक्कामोर्तब केले.

(IIT project in Kanakona is almost certain)

आयआयटी प्रकल्‍पाची जागा अद्याप निश्चित झालेली नाही, ती काणकोणातही असू शकते असे तवडकर म्‍हणाले. या बैठकीत श्री निराकार शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी लोलये व पैंगीण पंचायत क्षेत्रात कोमुनिदाद

संस्थेची जमीन असल्‍याचे सांगून या दोन्ही कोमुनिदाद संस्था आयआयटीसाठी जमीन देण्यास तयार असल्‍याचे स्‍पष्‍ट केले. तसेच सभापती रमेश तवडकर यांनी या प्रकल्पासाठी आग्रह धरून तो काणकोणात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. त्यांच्या प्रयत्नांना संपूर्ण पाठिंबा देण्यात येणार असल्याचे नाईक यांनी सांगितले.

निवृत्त मुख्याध्यापक शांताजी नाईक गावकर यांनी आयआयटी सारखा प्रकल्प काणकोणात येणे गरजेचे असल्याचे सांगितले. आयआयटीमुळे काणकोणचा सर्वच दृष्टीने विकास होण्यास मदत होणार असल्याचे ते म्‍हणाले. दरम्‍यान, सदर प्रकल्‍पाचे काणकोणात स्‍वागत होऊ लागले आहे.

‘व्हिजन काणकोण’साठी १७ समित्या : काणकोणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वच क्षेत्रांचा अभ्यास करून रोड मॅप तयार करण्यासाठी १७ समित्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने पर्यटन, काणकोणचे ब्रँडिंग, सहकार क्षेत्र, शिक्षण व मनुष्यबळ विकास, समाजकल्याण, कला व संस्कृती, हस्तकला, वन व पर्यावरण, कचरा व्यवस्थापन या व अन्य क्षेत्रांचा समावेश आहे. प्राचार्य डॉ. मनोज कामत यांनी या कार्यक्रमाची आखणी केली होती. समितीने तयार केलेल्या काणकोण विकासाच्या रोड मॅपची अंमलबजावणी केल्यास २०३० पर्यंत काणकोणचे चित्र बदलेल. या बैठकीला विविध पक्षांच्‍या नेत्‍यांसह ग्रामस्‍थांची उपस्‍थिती होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT