Shantadurga  Dainik Gomantak
गोवा

Shantadurga: शांतादुर्गा देवीच्‍या जत्रोत्सवाला उद्यापासून होणार प्रारंभ

चार दिवस भरगच्च कार्यक्रम; भाविकांसाठी दोन्ही वेळच्या भोजनाची सोय

Akshay Nirmale

Shantadurga: फातर्पा येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण संस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या शुक्रवार 23 डिसेंबरपासून सुरू होत आहे. 26 डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या चार दिवसीय उत्‍सवात विविध धार्मिक विधींसह देवीची चांदीचा रथ, मयूर रथ, सूर्य रथ तसेच महारथातून मिरवणूक काढण्‍यात येणार आहे. संस्थानच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत श्री शांतादुर्गा भूमिपुरुष, सप्तकोटेश्वर मंदिर समिती अध्यक्ष दिवाकर बो. ना. देसाई यांनी जत्रोत्सवाबाबत सविस्तर माहिती दिली.

जत्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्‍हणजे उद्या शुक्रवारी 23 रोजी सकाळी धार्मिक विधी, रात्री नमन, 10 वाजता शिबिकोत्सव, नंतर श्रींची चांदीच्या रथातून भव्य मिरवणूक, दारूकामाची आतषबाजी, आरती, प्रसाद आणि त्‍यानंतर धनराज मडकईकर प्रस्तुत संगीत कार्यक्रम ‘स्वरधनू’ सादर करण्‍यात येणार आहे. शनिवारी 24 रोजी सकाळी नित्य धार्मिक विधी, महाभिषेक, रात्री 10 वाजता शिबिकोत्सव, नंतर श्रींची मयूर रथातून भव्य मिरवणूक, दारूकामाची आतषबाजी, आरती, प्रसाद झाल्‍यानंतर कोकणी नाटक ‘बायलेक दुवाळे, घोवाक ओकारे’ होणार आहे.

रविवारी 25 रोजी सकाळी नित्य धार्मिक विधी, महाभिषेक, रात्री 10 वाजता शिबिकोत्सव, नंतर श्रींची सूर्य रथातून भव्य मिरवणूक, दारूकामाची आतषबाजी, आरती, प्रसाद व नंतर ‘रोम रोम रोमांटिक’ हे कोकणी नाटक सादर करण्‍यात येणार आहे. अखेरच्या दिवशी म्‍हणजे सोमवार दि. 26 रोजी सकाळी नित्य धार्मिक विधी, श्रींस महाभिषेक, रात्री 10 वाजता ऑर्केस्ट्रा तर मंगळवारी सकाळी 6 वाजता श्रींची महारथातून भव्य मिरवणूक, दारूकामाची आतषबाजी, आरती, प्रसाद झाल्‍यानंतर जत्रोत्सवाची सांगता होणार आहे.

देवीसाठी आलेल्‍या वस्‍तूंचा तीन दिवस लिलाव

जत्रोत्‍सवाच्‍या दिवसांत दररोज दुपारी व रात्री देवीस महानैवेद्य व भाविकांसाठी महाप्रसाद होणार आहे. तसेच दि. 28, 29 व 30 रोजी भाविकांनी देवीस अर्पण केलेल्या सोन्या-चांदीचे दागिने, कपडे व इतर वस्तूंचा सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जाहीर लिलाव केला जाईल. जत्रोत्सवाच्या कालावधीत भाविकांसाठी दोन्ही वेळच्या भोजनाची सोय करण्यात आली आहे. मंदिर परिसरात सर्वत्र लाईव्ह सीसीटीव्‍हीसह 35 कॅमेरे बसविण्यात आले असून भाविकांच्या सोयीसाठी पोलिसांसह स्वयंसेवकही कार्यरत असतील. श्री सप्तकोटेश्वर मंदिराचे जवळपास 95 टक्के काम पूर्ण झालेले आहे. उर्वरित काम झपाट्याने पूर्णत्वाकडे जात आहे. भाविकांनी सढळ हस्ते हातभार लावल्यास उर्वरित कामही सुलभरीत्या पूर्ण होईल, अशी अपेक्षा अध्यक्ष देसाई यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT