Zuari Bridge: झुआरी पुलाचे उद्घाटन लांबणीवर; 'या' तारखेला होणार उद्घाटन

26 डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते होणार होते उद्घाटन
New Zuari Bridge
New Zuari BridgeDainik Gomantak
Published on
Updated on

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज गुरुवारी सकाळी नवीन झुआरी पुलाची पाहणी केली होती. येत्या चार दिवसांत केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन होणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली होती. परंतु आता नवीन झुआरी पुलाचे उद्घाटन लांबणीवर पडले आहे. काही कारणांमुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आज संध्याकाळी दिली. यावेळी त्यांनी उद्घाटनाची नवी तारीख जाहीर केली.

गोव्यात वाहतूक कोंडीची मोठ्या प्रमाणात समस्या आहे. जुन्या झुआरी पुलाच्या दोन्ही बाजूने होणाऱ्या वाहतुकीच्या कोंडीला वाहनचालकांना सामोरे जावे लागते. तसेच नाताळ व नववर्षाच्या पूर्वसंध्येला गोव्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याचे अपेक्षित आहे. या कारणामुळे नवीन झुवारी पुल डिसेंबर संपण्यापूर्वी नागरीकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनीक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली होती. दरम्यान, आज गुरुवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नवीन झुआरी पुलाची पाहणी केली. येत्या चार दिवसांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. काही काळानंतर नवीन पुलाची दुसरी बाजूही सुरु करण्यात येईल. पूर्ण प्रकल्प हा 13.2 किलोमीटर लांबीचा आहे अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मात्र आता काही कारणांमुळे झुआरी पुलाचे उद्घाटन लांबणीवर पडले आहे. "29 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची वेळ 26 डिसेंबर रोजी मिळाली नसल्याने हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. दक्षिण गोव्यातील नागरिकांचे नवीन झुआरी पुल हे स्वप्न होते. नव्या वर्षाची भेट म्हणून 29 डिसेंबरला नवीन झुआरी पुलावर सायंकाळी 6 ते 9 पर्यंत भव्य दिव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास गोव्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी गोमंतकीयांना केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa CM Pramod Sawant accident help
Congress Targets BJP Goa
Goa ST Political Reservation
Goa Crop Loss Compensation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com