Mumbai To Panaji AC Bus: ख्रिसमसनिमित्त गोवेकरांना भेट, मुंबई ते पणजी एसी बससेवा; दर रेल्वे तिकीटापेक्षाही कमी

उद्यापासून बससेवेस सुरवात; MSRTC च्या अॅपवरूनही बुक करता येणार
Mumbai To Panaji AC Bus
Mumbai To Panaji AC BusDainik Gomantak
Published on
Updated on

Mumbai To Panaji AC Bus: महाराष्ट्र राज्य परिहवन महामंडळ (MSRTC) ने मुंबई-पणजी मार्गावर वातानुकूलित (एसी) शिवशाही बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या या निर्णयाने गोवेकरांना ऐन ख्रिसमसमध्ये आणि नववर्षानिमित्त मोठे गिफ्ट मिळाले आहे. विशेष म्हणजे, या बससेवेचे दर रेल्वेदरांपेक्षाही कमी आहेत.

Mumbai To Panaji AC Bus
Sahitya Akademi Award: कोंकणी लेखिका माया खरंगटे यांंच्या कादंबरीला ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार

या एसी बसचे तिकीट 1 हजार 245 रुपये इतके असणार आहे. शुक्रवार (23 डिसेंबर) पासून या सेवेस सुरवात होत आहे. या बसच्या प्रवासात पनवेल, महाड, चिपळूण, राजापूर, कणकवली, सावंतवाडी असे थांबे असणार आहेत. मुंबई सेंट्रलहून दुपारी 4.30 वाजता ही बस सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजता ती पणजीमध्ये पोहचेल.

मुंबई-गोवा या मार्गावर सध्या गोवा राज्य परिवहन महामंडळाची 'कदंब' ही बससेवा सुरू आहे. तिचे प्रतिप्रवासी भाडे 1 हजार 250 रूपये इतके आहे. शिवाय या मार्गावरील इतर खासगी बसेसचे भाडे साधारण दीड हजार रूपयांपर्यंत असते. पुढील आठवड्यात ख्रिसमस आणि नवीन वर्षांच्या सेलिब्रेशनच्या पार्श्वभुमीवर खासगी बसेसचे भाडे 2 ते 2.5 हजारांवर जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत प्रवाशांना एसटीच्या शिवशाहीचा आरामदायी पर्याय उपलब्ध होत आहे.

Mumbai To Panaji AC Bus
Mopa Airport: मोपा विमानतळाच्या नावाबाबत पुन्हा संभ्रम; सरकारी जाहिरातीतूनच वगळले 'मनोहर' नाव

या बसचे आरक्षण एसटीच्या आरक्षण कार्यालयांसह एमएसआरटीसी मोबाइल अॅपवरूनही करता येणार आहे. नवीन वर्षाची सुरवात करण्यासाठी गोव्याला जाणाऱ्या मुंबईतील पर्यटकांनाही या बससेवेचा लाभ होणार आहे. पर्यटकांची ही गरज लक्षात घेऊनच महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com