Environmental Conservation Dainik Gomantak
गोवा

Environmental Conservation : ‘शिरगाव’च्या मुलांना पर्यावरण संवर्धनाचा ध्यास; कचरा संकलन उपक्रम

2017 पासून आतापर्यंत 23 हजार कागदी पिशव्यांचे वाटप

तुकाराम सावंत

प्लास्टिक कचरा संकलन आदी माध्यमातून डिचोली तालुक्यातील शिरगाव येथील सरकारी प्राथमिक शाळेने सुरू केलेला प्लास्टिकमुक्तीचा प्रयोग यशस्वी ठरत आहे. या उपक्रमांतर्गत पालक आणि शिक्षकांच्या पुढाकारातून शाळेतील कोवळ्या मुलांनीही पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेतला आहे.

प्लास्टिक कचरा संकलित करण्याबरोबरच कागदी पिशव्या बनवून त्या लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना प्लास्टिक मुक्तीचा संदेशही मुले देत आहेत. शाळेत चार भिंतीआड मिळणाऱ्या शिक्षणाबरोबरच मूल्यवर्धित आणि संस्कारक्षम शिक्षणही या शाळेतून विद्यार्थ्यांना मिळत आहे.

प्लास्टिक मुक्तीचा ध्यास घेतलेल्या मुलांनी 2017 या वर्षीपासून आतापर्यंत 23 हजार कागदी पिशव्यांचे दुकानदारांना वाटप केले आहे. शिरगावच्या लईराई देवीच्या जत्रोत्सव काळात स्टॉल्स थाटणाऱ्या दुकानदारांना या कागदी पिशव्यांचे वाटप करून मुलांकडून प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यात येत आहे.

2017 साली हा उपक्रम हाती घेण्यात आला. ‘कोविड’ महामारीमुळे मध्यंतरीची दोन वर्षे वगळता यावर्षी मिळून आतापर्यंत या शाळेच्या मुलांनी दुकानदारांना २३ हजार कागदी पिशव्यांचे वाटप केले.

विद्यार्थ्यांकडून मिळतो उत्स्फूर्त प्रतिसाद

गेल्या सहा वर्षांपासून शिरगावच्या प्राथमिक शाळेत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत आपल्या घरामध्ये निर्माण किंवा जमा होणारा प्लास्टिक कचरा रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांमध्ये भरून शाळेत आणून देण्याचे आवाहन शाळेतील शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना केले आहे. या उपक्रमाला पालक आणि विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमानुसार शाळेत प्लास्टिकचे संकलन होत आहे.

‘कौटिल्य’ कंपनीकडूनही कौतुक

२०२१ साली गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून या अभिनव उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला आहे. गेल्या वर्षी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून मुलांनी वर्षभर बाटल्यांमध्ये साठवलेला प्लास्टिक कचरा रिसायकलिंगसाठी तुये-पेडणे येथील ‘कौटिल्य रि-पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या स्वाधीन केला होता. त्यावेळी ‘कौटिल्य’ कंपनीच्या संचलकांनी मुलांच्या या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले होते. अजूनही शाळेत हा उपक्रम चालू आहे.

"पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. प्लास्टिक मुक्तीचा संस्कार विद्यार्थ्यांवर रुजावा यासाठी शाळेतर्फे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येतात. प्लास्टिक कचरा संकलन आणि कागदी पिशव्यांचे वाटप, हा पर्यावरण संवर्धनाचा भाग आहे. याकामी शिक्षक आणि पालकांचे योगदानही तेवढेच महत्त्वाचे आहे."

- योगीता पुनाळेकर, कार्यकारी मुख्याध्यापिका

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT