Valpoi News : मासोर्डेत वाहतेय औषधीयुक्त झर! त्वचारोगांवर रामबाण उपाय

मुत्राशय रुग्‍णांसाठीही लाभदायक; अनेकांना प्रचिती
Medicinal springs
Medicinal springsDainik Gomantak

सत्तरी तालुक्याला निसर्गसंपदेचा वरदहस्त लाभला आहे. चोहोबाजूंनी डोंगर व डोंगराच्या पायथ्यांशी असलेली शेती, बागायती, लोकजीवन म्हणजे आनंददायी जीवन. सत्तरीतील गावागावांतील जलस्रोत लोकांची तहान भागवत आहेत.

जमिनीतून, डोंगरातून वाहणारे पाण्याचे झरे मानवी जीवन सुखमय करीत आहेत. अशा दगडांतून पाझरणारे झऱ्यांतील पाणी स्वच्छ असते. अशीच एक झर वाळपई शहरापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्‍या मासोर्डे गावातील शेकडो वर्षे वाहत आहे. या झरीचे पाणी स्वच्छ तर आहेच, शिवाय औषधी गुणांनी भरलेले आहे, असे अनेकांचे म्‍हणणे आहे.

Medicinal springs
Vasco Crime News : ‘त्या’ नराधम पित्याचा पोलिसांना सतत गुंगारा

मासोर्डे गावात निसर्गाच्या कुशीत वसलेल्‍या या झरीच्‍या पाण्‍यात स्‍नान केल्‍यास त्‍वचारोगांबरोबरच अनेक आजार बरे होतात असा लोकांचा दावा आहे. उन्‍हाळ्‍याच्‍या दिवसांत अंगाला येणारे घामोळे नाहीसे होते. तसेच मुतखड्याचा त्रास असलेल्‍या लोकांनी या झरीचे पाणी पिल्यास त्‍यांच्‍यासाठी ते लाभदायी ठरते. अशा या औषधी झरीची महती सर्वदूर पसरल्‍याने तेथे स्‍नान करणाऱ्यांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

सत्तरी तालुक्याला वैभवशाली इतिहास आहे. मासोर्डे गावची संस्‍कृती व इतिहास वैशिष्‍ट्यपूर्ण आहे. या गावात बारमाही वाहणारी औषधीयुक्त झर चैतन्याचे व प्रेरणेचे श्रद्धास्रोतच म्हणावे लागेल. या झरीने गावाला चेतना दिली आहे व त्यातून लोकांचे जीवन फुलले आहे. गावातील कैक पिढ्या या अमृतमयी झरीच्या शुद्ध धारेवर पोसल्या गेल्‍या आहेत.

औषधी गुणांनी भरलेली ही झर येथील लोकांनी याआधी अनेकदा दुरूस्त केली. त्यामुळे उन्हाळ्यात राज्यातून हजारो लोकांची पावले झरीचे पाणी अंगावर घेण्यासाठी येत असतात. या झरीचा शीतल गारवा चाखताना येथील हिरवाई व निसर्गवैभव अनुभवण्यास मिळत आहे.

Medicinal springs
Stray Dog Attack: भटक्या कुत्र्यांना कच्चे मांस खायला घालणाऱ्यांना अटक करा; दाजी साळकरांची मागणी

झरीचे संवर्धन गरजेचे : कृष्णा गावस

गावातील लोक, युवक, शांतादुर्गा कला मंचने याआधीही सदर झरीच्या दुरूस्तीसाठी पुढाकार घेतला होता. नागरिक कृष्णा गावस म्हणाले की, "मासोर्डेच्या झरीवर राज्यभरातून लोक आंघोळीसाठी येतात. त्वचा रोग, मुतखड्यावर हे पाणी लाभदायी ठरल्याचा लोकांनी अनुभव घेतलेला आहे. गरमीचा दाह शमविण्यासाठी मासोर्डेच्या झरीकडे लोकांची पावले वळत आहेत. तिचे संवर्धन करणे गरजेचे आहे. सरकारने या झरीच्‍या सौंदर्यीकरणासाठी पुढाकार घेतला पाहीजे. सध्‍या मासोर्डे देवस्थानतर्फे झरीची काही ठिकाणी दुरुस्ती करण्‍यात आलेली आहे."

"मासोर्डेची झर औषधीयुक्त असल्याची प्रचिती अनेकांना आलेली आहे. कित्‍येकांना रोगांपासून, आजारांपासून मुक्ती मिळालेली आहे. झरीच्या बाजूलाच दोन नद्यांचा संगम होतो. त्यामुळे नारळ, सुपारी बागायतींच्या सान्निध्यात झरीची शान अधिकच बहरत आहे."

म्हाळू गावस, ग्रामस्‍थ

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com