Goa Police: अडीच लाख रूपये लुटणाऱ्या चोरट्याचा पोलिसांना गुंगारा; वैद्यकीय तपासणीसाठी नेताना झाला पसार

गोवा वैद्यकीय महाविद्यालय रूग्णालयातील घटना
Goa Police
Goa PoliceDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Police: वास्को पोलिसांनी अटक केलेला एक चोरटा वैद्यकीय तपासणीसाठी नेले असताना पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाला आहे. पी. रमेश (50) असे या संशयित चोरट्याचे नाव आहे.

Goa Police
Vasco Crime News : ‘त्या’ नराधम पित्याचा पोलिसांना सतत गुंगारा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या आरोपीला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (GMC) वैद्यकीय तपासणीसाठी नेले जात असताना हा प्रकार घडला. वास्को पोलिसांनी गुरूवारी त्याला अटक केली होती.

फेब्रुवारीमध्ये झालेल्या एका चोरीप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. त्याने कारची काच फोडून सुमारे 2,50,000 रूपयांची रोकड लुटली होती. पी. रमेशला अटक केल्यानंतर त्याला 2 पोलिस हवालदारांसह वैद्यकीय तपासणीसाठी GMC येथे नेण्यात आले.

तिथून आरोपी पोलिसांना गुंगारा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. आता त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Online Financial Fraud
Goa Medical College MBBS Seats
GMC Trainee Death Case
Margao Woman Cheated 33 lakhs
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com