Goa River  Dainik Gomantak
गोवा

Goa River: राज्यातील सहा नदीपट्टे प्रदूषित; केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जलस्रोतांची पाहणी

Goa River: देशभरात एकूण ३११ नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून यात गोव्यातील तब्बल ६ नदीपट्टे असल्याचे वास्तव आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa River: देशभरात एकूण ३११ नदीपट्टे प्रदूषणामुळे धोक्याच्या पातळीवर असून यात गोव्यातील तब्बल ६ नदीपट्टे असल्याचे वास्तव आहे. प्रदूषण रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संथगतीने केल्या जात असल्याने या सहा नद्या अद्याप प्रदूषणमुक्त जाहीर करता आलेल्या नाहीत.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ हे वेगवेगळ्या राज्यांची तसेच केंद्रशासित प्रदेशांची प्रदूषण नियंत्रण मंडळे किंवा समित्यांच्या सहयोगाने राष्ट्रीय जल स्तर निरीक्षण कार्यक्रमामार्फत विविध ठिकाणच्या नद्यांची तसेच इतर जलस्रोतांची गटवार पाहणी आणि गुणवत्ता स्तर तपासणी करीत असते. राज्यातील मांडवी, झुआरी, साळ, कळणे, खांडेपार आणि म्हापसा या नद्यांतील काही भाग प्रदूषित झाल्याचे मंडळाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (Central Pollution Control Board) अहवालानुसार अतिप्रदूषणाने नद्यांची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून वातावरणीय बदल, कमी पाऊस, मानवनिर्मित प्रदूषण, सांडपाणी, उद्योगांमधील प्रक्रिया न केलेले रासायनिक पाणी, जलपर्णी इत्यादी कारणांमुळे नागरिकांचे आणि जलचर प्राण्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

उद्योगांमध्ये प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी होत नसल्यामुळे उद्योगातील घातक रसायने आणि सांडपाणीही नदी प्रदूषणासाठी कारणीभूत ठरत आहे.

प्रकाशित झालेल्या अहवालानुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या जलगुणवत्ता स्तर तपासणीनुसार देशातील ६०३ नद्यांपैकी ३११ नद्यांवरील काही भाग प्रदूषित आढळले. या नद्यांची जैव-रासायनिक ऑक्सिजन (बीओडी) आवश्यकता तपासण्यात आली होती. ही चाचणी सेंद्रिय प्रदूषणाचा (Pollution) स्तर निश्चित करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोठा आवाज, टिंटेड गाडी आणि जीवघेणी स्टंटबाजी! गोव्यात प्रसिद्ध इन्फ्लुएंसरची मॉडिफाईड BMW जप्त

Terror Attack In Jammu Kashmir: 'ऑपरेशन सिंदूर'चा बदला! जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी सुरु, गुप्तचर रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

MS Dhoni Retirement: 'कॅप्टन कूल'च्या निवृत्तीबद्दलचा सस्पेन्स संपला! एमएस धोनी IPL 2026 खेळणार की नाही? CSK च्या CEO ने स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

Horoscope: 2026 साठी काहीच दिवस बाकी! शनि-गुरूच्या हातात नशिबाचे चक्र, 'या' राशींना मिळणार भाग्याची खास साथ; मात्र काहींना साडेसातीचा धोका फार

अग्रलेख: फोंड्यात रविंचा उत्तराधिकारी कोण?

SCROLL FOR NEXT