Sal River Goa: साळ नदीपात्रात अतिक्रमण, बेकायदा बांधकामाकडे पंचायतीचा कानाडोळा

याचिकेवर खंडपीठात उद्या सुनावणी
Sal River Goa
Sal River GoaDainik Gomantak

Sal River Goa गिरकरवाडा - हरमल येथील एनडीझेड क्षेत्रातील सीआरझेड भागात झालेल्या एका बेकायदा बांधकामाची दखल घेऊन कारवाईचे निर्देश दिल्याची घटना ताजी असतानाच आता राज्यातील अन्य अनधिकृत बांधकामांविरुद्ध खंडपीठाने आक्रमक भूमिका घेत कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे उभी राहिलेली अनेक बांधकामे पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Sal River Goa
National Games 2023: राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रंगला खेळ पावसाचा, गोव्यात वेधशाळेद्वारे यलो अलर्ट

केळशी पंचायतमधील पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील ‘एनडीझेड’च्या सर्वे क्रमांक 106/3 मधील साळ नदीच्या काठावरील कथित बेकायदा पब तथा पार्टी स्थळाचे बांधकाम पाडण्याचा आदेश बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिल्याची माहिती हाती आली आहे.

या बांधकामाविरोधात कारवाई कऱण्याकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी दक्षिण गोव्यातील पंचायत उपसंचालक तसेच गटविकास अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशी प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देशही पंचायत संचालकांना दिले आहेत.

परवाने न घेता हे बांधकाम केल्याचा दावा करण्यात आला होता. यामुळे पर्यावरणाचे नुकसान व ‘सीआरझेड’ नियमांचे उल्लंघन झाले आहे. हे क्षेत्र एनडीझेडमध्ये येत असल्याने कारवाईची विनंती करण्यात आली होती.

या तक्रारीची दखल घेत पंचायतीने बांधकाम मालकाला 23 जून रोजी नोटीस बजावून ‘काम बंद’ ठेवण्याचे निर्देश दिले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी न करता बांधकाम सुरूच ठेवले होते. त्यामुळे या स्थळावरील हे बांधकाम पाडण्याचा आदेश बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिलाय

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com