CM Dr. Pramod Sawant Dainik gomantak
गोवा

Goa Budget Session : विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 मार्चपासून

सत्तरीतील चार ग्रामपंचायतींना जमीन हस्तांतरित

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Budget Session : विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 मार्चपासून सुरू होणार आहे. एक आठवडा हे अधिवेशन चालणार असून आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयास मान्यता देण्यात आली. तसेच सत्तरी तालुक्यातील चार ग्रामपंचायतींना साहित्य पुनर्प्राप्ती सुविधा (एमआरएफ) साठी सरकारी जमीन हस्तांतरित केली आहे.

त्याशिवाय सौरऊर्जा धोरण 2017 दुरुस्ती मंजूर केले असून गुरे व्यवस्थापन योजनेअंतर्गत आणखी दोन नवीन वाहने खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पर्वरीतील विधानसभा संकुलात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत पंचायतमंत्री माविन गुदिन्हो उपस्थित होते.

गोवा सरकार आणि पंतजली योगपीठ यांच्यात करार झाला आहे. कृषी, फलोत्पादन, दुग्ध व्यवसाय, ग्रामीण विकास प्राधिकरण आणि आदिवासी कल्याण खात्याअंतर्गत योजनांचा त्‍यात समावेश असणार आहे, असे मुख्‍यमंत्री सावंत म्‍हणाले.

कर्मचाऱ्यांची संख्या मंत्र्यांच्याबरोबरीने आणण्यासाठी सभापती कार्यालयाला दोन अतिरिक्त पदे मंजूर केली आहेत. म्हापसा विशेष मुलांसाठीच्‍या आस्था शाळेसाठी ना हरकत दाखला आणि परवाना शुल्क माफ करण्‍यात येणार आहे.

सरकारने हे अधिवेशन एका आठवड्याचे असे म्हटले आहे. माझ्या माहितीप्रमाणे मार्च महिन्यात 30 तारखेला एक दिवस रामनवमीची सुट्टी आहे. पण शनिवार, रविवार सोडल्यास फक्त पाच दिवस मिळतात. त्यात एक सुट्टी म्हणजे प्रत्यक्षात हे अधिवेशन चार दिवसांचेच असेल. सरकारने ‘गोवा की बात’ करण्यापेक्षा विधानसभेत प्रश्नांना सामोरे जावे. त्यामुळे खऱ्या अर्थाने जनतेच्या प्रश्नांचा सोक्षमोक्ष लागेल.

विजय सरदेसाई, अध्यक्ष, गोवा फॉरवर्ड

‘आग्वाद’च्या विषयात लक्ष घालणार

नूतनीकरण केलेला आग्वाद किल्ला आणि संग्रहालयात उघडण्यात आलेल्या मद्यालयावरून सध्या सरकारवर जबर टीका होत आहे. गोव्याच्या मुक्तिलढ्याशी संबंधित वास्तूत बार खुला करून स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान झाल्याच्या प्रतिक्रिया व्‍यक्त होत आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारले असता ‘आपण त्‍यात लक्ष घालणार आहे’ अशी त्रोटक प्रतिक्रिया त्यांनी दिली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करणार"! रितेश नाईकांनी दिली ग्वाही; पांचमे- खांडेपार तळ्याच्या संवर्धन कामाचे केले उद्‍घाटन

Farmagudhi to Bhoma Road: फर्मागुढी-भोम रस्ता काम होणार सुरु! मंत्री कामतांची ग्वाही; बांदोडा ‘अंडरपास’चे उद्‌घाटन

Chimbel Unity Mall: 'चिंबल' ग्रामस्थांचे मोठे यश! युनिटी मॉल बांधकाम परवान्याला दिले आव्हान; सरकारी पक्षाचा विरोध फेटाळला

Goa Electricity Department : गोवा वीज खात्याला 182 कोटींचा तोटा! 2558 कोटी खरेदी खर्च; फरकाची रक्कम राज्य सरकार भरणार

Pilgao: 'आता शेतकरी स्वस्थ बसणार नाहीत'! पिळगाववासीय उतरले रस्त्यावर; खनिज वाहतूक अडवली; प्रलंबित प्रश्‍न सोडवण्याची केली मागणी

SCROLL FOR NEXT