गोव्यात मागील वर्षाच्या तुलनेत 2022 मध्ये अमली पदार्थाच्या जप्तीमध्ये 65 टक्के वाढ झाली आहे. पण, अलीकडेच पोलिसांच्या वाढलेल्या कारवायांमुळे अमली पदार्थसंबधित घटनांमध्ये वाढ झाली आहे. असे गोवा पोलिसांनी मंगळवारी स्पष्ट केले. तसेच, गोव्यात अमली पदार्थांची निर्मिती होत नाही. राज्यात अमली पदार्थाचे कोणतेही सिंडिकेट कार्यरत नाहीत. असे पोलिसांनी म्हटले आहे.
"गोव्यात केवळ अमली पदार्थांची किरकोळ विक्री होते. गोव्यात अमली पदार्थांची निर्मिती होते आणि राज्यात एक संघटित ड्रग सिंडिकेट कार्यरत आहे या आरोपांना समर्थन देणारा कोणताही पुरावा आम्हाला सापडला नाही." अशी माहिती उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक (एसपी) निधिन वाल्सन यांनी एका इंग्राजी वृत्तपत्राला दिली आहे.
"अमली पदार्थ बाहेरून राज्यात येतात, त्यानंतर त्याची येथे विक्री केली जाते. विविध मार्गांनी राज्यात अमली पदार्थ येतात. ट्रेन आणि बसच्या मार्गे देखील राज्यात अमली पदार्थ येतात." असेही वाल्सन म्हणाले.
"गांजा आणि चरस यासारखे अमली पदार्थ भारतीय लोकच राज्यात घेऊन येतात. आणि कोकेनसारख्या सिंथेटिक अमली पदार्थच्या बाबतीत आम्हाला परदेशी नागरिकांचा सहभाग आढळून आला आहे." असे वल्सन यांनी स्पष्ट केले.
अलीकडच्या काळात पोलीस अधिक सतर्क आणि सक्रिय झाले आहेत, त्यामुळे अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. असेही वाल्सन म्हणाले.
"मुख्यमंत्री आणि पोलिस महासंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व पोलिस अधिकार्यांना ड्रग्जबाबत झिरो टॉलरन्स पॉलिसी अवलंबण्याच्या सूचना दिल्या आहेत. आम्ही विशिष्ट टीम तयार केल्या आहेत आणि सर्व अधिकार्यांना ड्रग्जच्या विरोधात कारवाई करण्यासाठी वारंवार माहिती दिली जात आहे."
"इतर राज्यातून अमली पदार्थ घेऊन गोव्यात येतात पेडलर्स त्यांच्याकडून ते विकत घेतात. पण, जेव्हा विक्रेता पकडला जातो तेव्हा बातमी पसरते आणि मुख्य विक्रेता भूमिगत होतो."
"अशा लोकांचा आम्ही मागोवा घेत असतो. त्यांना लगेच पकडले जाईल असे नाही. आमच्याकडे तपशील आहेत आणि जसे आम्हाला ते सापडले, आम्ही लगेच त्यांना अटक करतो."
2022 मध्ये ड्रग्ज जप्ती मध्ये 65 टक्के वाढ
गोव्यात मागील वर्षाच्या तुलनेत 2022 मध्ये अमली पदार्थ जप्तीमध्ये 65 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी, पोलिसांनी 5.1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 207 किलोग्राम अमली पदार्थ जप्त केले आणि 180 जणांना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांपैकी निम्म्याहून अधिक बाहेरील राज्यातील (97), त्यानंतर गोवा (54) आणि परदेशी (29) आहेत. 2021 मध्ये, गोवा पोलिसांनी 2.7 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे 134 किलोग्राम विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त केले आणि 138 जणांना अटक केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.