body of the youth found Dainik Gomantak
गोवा

म्हादई नदीच्या पात्रात बुडालेल्या युवकाचा अखेर मृतदेह सापडला

आज दुपारी मृतदेहाचा शोध घेण्यात अग्निशमक दलाच्या जवानांना यश आले

गोमन्तक डिजिटल टीम

सत्तरीतील वेळगे नदीच्या पात्रात बेती पर्वरीतील 18 वर्षीय युवक रविवार संध्याकाळी सहलीसाठी आला असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला होता. वाळपई अग्निशमक दलाच्या जवानांनी युवकाचा शोध घेतला. मात्र, काल रात्र झाल्याने शोध मोहिम थांबवावी लागली होती.

अखेर आज दुपारी मृतदेहाचा शोध घेण्यात अग्निशमक दलाच्या जवानांना यश आले. मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणी गोमोकाॅत पाठविण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रविवारी सुट्टीच्या दिवशी बेती पर्वरी येथील 18 वर्षीय युवक शिवकुमार पवार व त्याच्या मित्रांचा ग्रुप वेळगे सत्तरी येथील राजग्योची कोंड या म्हादई नदी परिसरात आले होते.

पोहण्यासाठी नदीत उतरले होते. त्यापैकी शिवकुमार हा नदीच्या प्रवाहात वाहून गेला तर आणखीन एकाला बुडताना वाचविण्यात साथीदारांना यश मिळाले. घटनेची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

शिवकुमार याचा शोध घेण्यात आला. मात्र, रात्र झाल्याने शोध मोहीम थांबविण्यात आली. सोमवारी सकाळ पासुन वाळपई अग्नीशमन दलाच्या जवानांनी युध्द पातळीवर शोध मोहिम राबवली होती. त्यानंतर दुपारी 1 च्या नंतर मृतदेह शोधण्यात यंत्रणेला यश आले. यावेळी पंचनामा करुन मृत्यदेह गोमोकाॅत पाठविण्यात आला आहे.

वाळपई पोलिस निरिक्षक दिनेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे. तसेच अग्नीशमन दलाच्या अधिकारी संतोष गावस यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी मदत कार्य केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT