Goa Tourism: पर्यटकांची पावले ग्रामीण भागाकडे! मात्र सरकारकडून साहाय्‍याची अपेक्षा

देशी पर्यटकांमध्ये 50 तर विदेशी पर्यटकांमध्ये 1000 टक्के वाढ
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Tourism गोव्याच्‍या ग्रामीण पर्यटन क्षेत्रात सध्या ‘हसू’ आणि ‘आसू’ अशी परिस्थिती आहे. मागच्या काही वर्षांत गोव्यात येणाऱ्या देशी आणि विदेशी पर्यटकांची पावले ग्रामीण भागाकडे वळू लागली आहेत.

पण गोव्यात ग्रामीण पर्यटनाला वाव मिळावा यासाठी सरकार पातळीवर जे प्रयत्न व्हायला पाहिजे होते, तसे झालेले दिसत नाहीत.

सरकारी आकडेवारीनुसार, गोव्याच्या अंतर्गत (ग्रामीण) भागात झालेल्या पर्यटनात पश्चिम घाटाला लागून असलेल्या सत्तरी, काणकोण, धारबांदोडा, सांगे या चार तालुक्यांत पर्यटनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या ठिकाणी झालेल्या पर्यटनात देशी पर्यटकांमध्ये 50 टक्के तर विदेशी पर्यटकांमध्ये 1000 टक्के वाढ झाली आहे.

सरकारी आकडेवारीनुसार २०२१ मध्ये ६५ हजारांहून अधिक देशी आणि १३०० हून अधिक विदेशी पर्यटकांनी गोव्याच्या अंतर्गत भागांना भेटी दिल्या. २०२२ मध्ये १.१० लाखांहून अधिक देशी आणि १४ हजारांहून अधिक परदेशी पर्यटकांनी या भागांना भेट दिली होती.

समुद्रकिनारे तर आहेतच पण अंतर्गत भागातही पर्यटन वाढावे, यासाठी गोवा सरकार प्रयत्न करत आहे. हिंटरलँड टुरिझम म्हणजे केवळ धबधब्यांना भेट देणे नव्हे, तर पर्यटकांनी स्थानिक संस्कृतीचा अनुभव घ्यावा, अशी सरकारची इच्छा आहे.

गोव्यात ७० हून अधिक लहान-मोठे धबधबे आहेत आणि पावसात ते भरून ओसंडू लागल्यावर पर्यटकांचे थवे तिथे जमा होऊ लागतात. असे असले तरी ग्रामीण भागातील पर्यटक व्यावसायिकांना त्याचा फायदा होतो का, हा प्रश्र्न विचारल्यास नकारार्थीच उत्तर मिळते.

Goa Tourism
Mid-Day Meal Plan : माध्यान्ह आहार प्रस्तावाला 'या' एनजीओंनी दिलाय प्रतिसाद, परराज्यातील स्वयंसहाय्य संस्थांचाही आहे समावेश

पूर्वाश्रमीचे पत्रकार आणि आता खोतीगाव अभयारण्य परिसरात ‘ध अर्दंन नेस्ट’ हे हॉटेल चालविणारे व्यावसायिक बासुरी देसाई यांना याबद्दल विचारले असता, गोव्‍यातील अंतर्गत भागात आता पर्यटकांची पावले वळू लागली आहेत ही गोष्‍ट खरी असली तरी या भागात हा व्‍यवसाय भरभराटीला यावा यासाठी सरकारकडून मात्र कुठलेही साहाय्‍य मिळत नाही.

अंतर्गत भागात कुठलाही पर्यटन प्रकल्‍प उभारायचा असेल तर त्‍याला गोवा सरकारच्‍या ईडीसीकडून कर्ज दिले जात नाही.

त्‍यामुळे गोवेकर या व्‍यवसायात उतरण्‍यास मागे पुढे होतो. ग्रामीण भागातील पर्यटन वाढवायचे असेल तर त्‍यासाठी निश्‍चित असे धोरण तयार करण्‍याची गरज त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

Goa Tourism
Canacona Accident: अपघातांची मालिका सुरूच! दुचाकींच्या अपघातात एकजण गंभीर जखमी

गावातील लोकांना मिळावा पर्यटनाचा लाभ

‘सामाजिक उपक्रमातून पर्यटन’ या संकल्‍पनेचे प्रवर्तक असलेले पराग रांगणेकर यांनी सांगितले की, ग्रामीण पर्यटनाचा फायदा बड्या पर्यटन व्‍यावसायिकांना न होता गावातील लोकांना होण्‍याची गरज आहे.

यासाठी गावातील पंचायत आणि स्‍वयंसेवा गटांना त्‍यात सामावून घेण्‍याची गरज आहे. गावात येणाऱ्या पर्यटकांशी कसे वागावे याचे प्रशिक्षण गावातील लोकांना दिले पाहिजे.

असे झाले तरच या वाढत्‍या पर्यटनाचा फायदा गावाच्‍या लोकांना होईल. मात्र अजून तरी त्‍या दृष्‍टीने हवे तसे प्रयत्‍न झालेले नाहीत.

Goa Tourism
Rumdamol Dispute: स्थानिक स्वराज्यसंस्था कुठे कमी पडतात?

सरकारला अभिप्रेत असलेल्‍या विविध ट्रेल्स

राज्य सरकारने गोव्यातील पर्यटन आणि ट्रेल्सची संकल्पना तयार करण्यासाठी एजन्सींना आमंत्रित केले आहे. नेचर ट्रेल्स, आर्किटेक्चर टूर, हेरिटेज ट्रेल्स, व्हिलेज वॉक, स्पिरिच्युअल ट्रेल्स आणि बर्ड वॉचिंग ट्रिप अशा पद्धतीच्या ट्रेल्स आयोजित केल्या जाणार आहेत.

पर्यटनाचे अनपेक्षित पैलू आणि विविध प्रेक्षणीय स्थळे समोर आणण्यासाठी कॅम्पिंग, बाईक टूर, खाद्यपदार्थ आणि पाककला टूर, ब्रुअरी टूर इत्यादी संकल्पनांसाठीही सरकार उत्सुक आहे.

गोव्‍याच्‍या अंतर्गत भागात पर्यटकांची पावले वळू लागली आहेत ही गोष्‍ट खरी असली तरी हा व्‍यवसाय भरभराटीला यावा यासाठी सरकारकडून मात्र कुठलेही साहाय्‍य मिळत नाही.

त्‍यामुळे गोवेकर या व्‍यवसायात उतरण्‍यासाठी द्विधा मन:स्‍थितीत असतो. म्‍हणूनच निश्‍चित धोरण गरजेचे आहे. - बासुरी देसाई, हॉटेल व्यावसायिक

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com