Konkan Railway: कोकण रेल्वे प्रवाशांसाठी खूषखबर, प्रवासी गाड्या...

चतुर्थीच्या दिवसांत प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणून सहा खास रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली आहे.
Konkan Railway
Konkan RailwayDainik Gomantak
Published on
Updated on

Konkan Railway कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहाय्याने चतुर्थीच्या दिवसांत प्रवाशांचे हाल होऊ नये म्हणुन सहा खास रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली आहे. रेल्‍वे क्रं. ०११७१ - मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी - ही गा़डी मुंबईहुन १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान रोजी रात्री १२.२० वाजता सुटणार आहे.

सावंतवाडीला त्याच दिवशी दुपारी २.२०ला पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०११७२ ही सावंतवाडी ते मुंबई सीएसएमटी ही गाडी १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान दररोज सावंतवाडीहून संध्याकाळी ३.१०ला सुटेल व

मुंबईला दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३५ला पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ०११५३ - दिवा जंक्शन ते रत्नागीरी ही गाडी १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान रोज दिवाहून सकाळी ७.१०ला सुटेल व रत्नागिरीला त्याच दिवशी २.५५ला पोहोचेल. ०११५४ क्रमांकाची ट्रेन रत्नागिरीहून संध्याकाळी ३.४० वाजता सुटेल व दिवा जंक्शनला त्याच दिवशी रात्रो १०.४० वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ०११६७ ही लोकमान्य टिळक टर्मिनस ते कु़डाळ दरम्यान १३, १४, १९,२०, २१, २४, २५,२६,२७, २८ सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसहून रात्री १०.१५ वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ९.३० वाजता कुडाळला पोहोचेल.

०११६८ क्रमांकाची ट्रेन कुडाळहुन १४, १५, २०, २१,२२, २५, २६, २७,२८, २९ सप्टेंबर व २, ३ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी रात्रो ९.५५ वाजता पोहोचेल.

Konkan Railway
Canacona Accident: अपघातांची मालिका सुरूच! दुचाकींच्या अपघातात एकजण गंभीर जखमी

ट्रेन क्रमांक ०११६९ पुणे ते करमळी दरम्यान गाडी १५, २२ व २९ सप्टेंबर रोजी पुण्याहुन संध्याकाळी ६.४५ वाजता सुटेल व करमळीला दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता पोहोचेल.

०११७० क्रमांकाची गाडी कुडाळहून १७, २४, सप्टेंबर व १ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४.०५ वाजता सुटेल व पुण्याला दुसऱ्या दिवशी पहाटे ५.५०ला पोहोचेल.

ट्रेन क्रमांक ०११८७ ही रेल्वे करमळी ते पनवेल दरम्यान धावणार आहे. ही गाडी १६, २३ व ३० सप्टेंबर रोजी करमळीहून दुपारी २.५० वाजता सुटेल व पनवेलला दुसऱ्या दिवशी पहाटे २.४५ वाजता पोहचेल.

०११८८ क्रमांकाची गाडी पनवेलहून १७,२४,सप्टेंबर व १ ऑक्टोबर या दिवशी पहाटे ५ वाजता सुटेल व कुडाळला दुपारी २ वाजता पोहोचेल.

Konkan Railway
Goa Tourism: पर्यटकांची पावले ग्रामीण भागाकडे! मात्र सरकारकडून साहाय्‍याची अपेक्षा

मुंबई ते मडगाव धावणार खास गाडी

ट्रेन क्रमांक ०११५१ व ०११५२ मुंबई सीएसएमटी ते मडगाव व परत ही गाडी १३ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबरदरम्यान धावणार आहे. ०११५१ क्रमांकाची गाडी १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत मुंबईहून सकाळी ११.५० वाजता सुटेल व मडगावला दुसऱ्या दिवशी पहाटे २.१०ला पोहोचेल. ०११५२ क्रमांकाची गाडी १४ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर या कालावधीत धावणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com