Tanvi Vast Lavish Lifestyle Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud Case: छानछोकी अन् ब्‍युटी पेजंटच्‍या आकर्षणात 'तन्वी'ने उडवले पैसे; कोट्यवधी रुपयांबाबत पोलिस तपास सुरु!

Tanvi Vast Lavish Lifestyle: पूर्वाश्रमीची सॅनी कुलासो; पण नंतर लग्‍न झाल्‍यानंतर तन्‍वी वस्‍त झालेल्‍या या युवतीला ग्‍लॅमरचे फार मोठे आकर्षण होते. त्‍यामुळेच ती वेगवेगळ्‍या ब्‍युटी पेजंटमध्‍ये भाग घ्‍यायची.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: आपले सौंदर्य आणि बोलण्‍याच्या शैलीतून वश करून तन्‍वी वस्‍त हिने अनेकांना करोडो रुपयांचा गंडा घातला. मात्र, तिची छानछोकीची जीवनशैली आणि ब्‍युटी पेजंटचे आकर्षण यातच तिने आपले सगळे पैसे घालवले, अशी माहिती प्राप्‍त झाली आहे. लाेकांना लुटून जी कोट्यवधीची माया तिने जमवली होती तिचे नेमके काय झाले, याचा ठाव सध्‍या कुडचडे पोलिस घेत आहेत.

पूर्वाश्रमीची सॅनी कुलासो; पण नंतर लग्‍न झाल्‍यानंतर तन्‍वी वस्‍त झालेल्‍या या युवतीला ग्‍लॅमरचे फार मोठे आकर्षण होते. त्‍यामुळेच ती वेगवेगळ्‍या ब्‍युटी पेजंटमध्‍ये भाग घ्‍यायची. या स्‍पर्धांच्‍या तयारीसाठी लाखो रुपये देऊन केलेले स्‍वत:चे फोटो शूट, स्‍पर्धेच्‍या तयारीसाठी प्रशिक्षकाला दिलेली लाखो रुपयांची बिदागी आणि स्‍पर्धेत वापरण्‍यासाठी घेतलेले लाखो रुपयांचे ड्रेसेस, यासाठी तिला हा अमाप पैसा लागायचा. हा पैसा उभा करण्‍यासाठी तिने लोकांना गंडा घालण्‍यास सुरुवात केली.

केपेचे पोलिस उपअधीक्षक सागर एकोस्‍कर यांना विचारले असता, कालच तिला न्‍यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावलेली आहे. तिने लोकांना फसवून उकळलेले पैसे नेमके कुठे वापरले, याचा आम्‍ही शोध घेत आहोत, असे त्‍यांनी सांगितले.

सध्‍या तन्‍वीच्‍या विरोधात कुडचडे पोलीस स्‍थानकात तीन तक्रारी नोंदविल्‍या आहेत. या तिन्‍ही तक्रारदार महिला असून पहिली तक्रार रोझालिना डायस हिने दाखल केली होती. रोझालिनाने आपले सोन्‍याचे दागिने कुडचडेच्‍या सेंट्रल बँकमध्‍ये लॉकरमध्‍ये ठेवण्‍यासाठी आणले होते. तन्‍वीने तिचे सोन्‍याचे दागिने बदलून त्‍या ठिकाणी खोटे दागिने आणून ठेवले.

त्‍याशिवाय या महिलेच्‍या खात्‍यातील ५.५० लाख रुपये तिने आपल्‍या खात्‍यात वळते केले. दुसरी तक्रार क्रिस्‍टालिना कुतिन्‍हो हिने केली असून तिच्‍या खात्‍यातील १४.२८ लाख रुपये तन्‍वीने असेच तिला न सांगता आपल्‍या खात्‍यात वळते केले हाेते. तिसरी तक्रार सेव्‍हरिना फर्नांडिस हिची असून तन्‍वीने तिच्‍या खात्‍यातील १.४० लाख रुपये आपल्‍या खात्‍यात वळते केले. आणि त्‍यानंतर तिच्‍याकडून अाणखी २.६४ लाख रुपये अशी एकूण ४.०४ लाखांची रक्‍कम बळकावली.

सीमकार्ड बदलून पैसे वळवले

1. तन्‍वीने आतापर्यंत ज्‍यांना गंडा घातला आहे, त्‍यापैकी बहुतेकजण वृद्ध व अशिक्षित महिला आणि कामगार वर्गातील लोक असल्‍याचे पुढे आले आहे. केंद्र सरकारच्‍या ‘व्‍हिजन इंडिया’ या योजनेमार्फत लाेकांना व्‍यवसाय करण्‍यासाठी छोट्या स्‍वरूपात कर्ज पुरविले जाते. अशा अर्जदारांना मदत करण्‍यासाठी तिची नेमणूक करण्‍यात आली होती. तन्‍वीने याच गोष्‍टीचा फायदा घेतला.

2. सुरुवातीला तिने बिगर गोमंतकीय कामगारांना हेरून त्‍यांच्‍यासाठी कर्ज उपलब्‍ध करण्‍याचे आमिष त्‍यांना दाखविले. त्‍यांच्‍याकडून कागदपत्रांची पूर्ती करून घेतल्‍यानंतर तुमचे अर्ज मंजूर झाले नाहीत, असे सांगून त्‍यांना वाटेला लावण्‍यात आले. मात्र, त्‍यांना कागदपत्रे परत केली नाहीत. याच कागदपत्रांच्‍या साहाय्‍याने नंतर तिने त्‍या अर्जदारांच्‍या नावे कर्ज घेऊन ते पैसे स्‍वत:साठी वापरले असे सांगण्‍यात येते.

3. वृद्ध महिलांना चांगली बँकसेवा देण्‍याच्‍या नावाने तिने नवीन सीमकार्ड्‌स आणण्‍यास सांगितले आणि ती नवीन सीमकार्ड्‌स तिने आपल्‍याकडे ठेवली. या नवीन सीमकार्ड्‌सवरून ओटीपी मिळवत तिने त्‍या महिलांच्‍या खात्‍यातील पैसे आपल्‍या खात्‍यात वळवल्‍याचे सांगितले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भुसावळ ते गोवा थेट रेल्वे सेवेची मागणी! मुंबईचा त्रास टळणार; हजारो कोकणवासीयांचा वेळ आणि पैसा वाचणार

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

Goa Shipyard Blast: लोटली स्फोटातील मृतांची संख्या वाढली; शिपयार्ड सील, सुरक्षा अधिकाऱ्याला अटक!

Asim Munir: पाकचे सैन्य प्रमुख आसिम मुनीरने पुन्हा ओकली गरळ; भारताला दिली अणुयुद्धाची धमकी Watch Video

Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! एसी कोचमध्ये स्वच्छतेवर भर; प्रवाशांना मिळणार कव्हर घातलेले ब्लँकेट

SCROLL FOR NEXT