Goa Fraud Case: पुण्याच्या ‘एनव्‍हे इनोव्‍हेंचर्स’ लिमिटेडला ग्राहक आयोगाचा दणका; गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचा आदेश

Goa State Consumer Commission: करंजाळे येथील दीप्‍ती चावडीकर व प्रसन्न चावडीकर यांनी राज्‍य आयोगासमोर हा आव्‍हान अर्ज दाखल केला होता.
Goa Fraud Case: पुण्याच्या ‘एनव्‍हे इनोव्‍हेंचर्स’ लिमिटेडला ग्राहक आयोगाचा दणका; गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचा आदेश
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

‘‘आमच्‍या एजन्‍सीमध्‍ये दीड लाखांची गुंतवणूक करा. त्‍या गुंतवणुकीतून तुम्‍हाला दरमहा १८ टक्‍के व्‍याज देऊ. शिवाय ग्राहकाला हव्‍या असलेल्‍या हॉटेलमध्‍ये चार दिवस आणि तीन रात्री मोफत स्‍टे मिळेल’’ असे आश्‍‍वासन देऊनही त्‍याची पूर्ती न करणाऱ्या पुण्‍यातील ‘एनव्‍हे इनोव्‍हेंचर्स’ लिमिटेड या कंपनीला राज्‍य ग्राहक आयोगाने दणका दिला आहे. गुंतवणूकदारांकडून घेतलेली दीड लाखांची रक्‍कम परत करण्‍याबरोबरच झालेल्‍या मन:स्‍तापाबद्दल २० हजार रुपयांची नुकसान भरपाई तर दाव्‍याचा खर्च म्‍हणून आणखी २५ हजार असे एकूण ४४ हजार रुपये फेडण्‍याचा आदेश दिला.

करंजाळे येथील दीप्‍ती चावडीकर व प्रसन्न चावडीकर यांनी राज्‍य आयोगासमोर हा आव्‍हान अर्ज दाखल केला होता. यापूर्वी उत्तर गोवा जिल्‍हा आयोगाने या दोन्‍ही गुंतवणूकदारांना १.४९ लाखाची रक्‍कम परत करण्‍याबरोबरच २० हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्‍याचा आदेश दिला होता.

Goa Fraud Case: पुण्याच्या ‘एनव्‍हे इनोव्‍हेंचर्स’ लिमिटेडला ग्राहक आयोगाचा दणका; गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचा आदेश
Margao Fraud Case: फरार योगेशविरोधात ‘लुक आऊट’ नोटीस का नाही? पोलिसांच्‍या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह

मात्र या आदेशाला राज्‍य आयोगाकडे आव्‍हान देताना तक्रारदाराने आपल्‍याला एक लाख रुपयाची नुकसान भरपाई आणि तेवढीच रक्‍कम दाव्‍याचा खर्च म्‍हणून देण्‍यात यावी अशी मागणी केली होती. गोवा राज्‍य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्‍या प्रभारी अध्‍यक्ष वर्षा बाळे यांच्‍यासमोर हा दावा आला असता त्‍यांनी ग्राहकाची तक्रार अंशता मान्‍य करताना जिल्‍हा आयोगाने दिलेली नुकसान भरपाई कायम ठेवताना दाव्‍याचा खर्च म्‍हणून आणखी २५ हजार रुपये तक्रारदाराला देण्‍याचा आदेश दिला.

Goa Fraud Case: पुण्याच्या ‘एनव्‍हे इनोव्‍हेंचर्स’ लिमिटेडला ग्राहक आयोगाचा दणका; गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचा आदेश
Goa Fraud Case: बनावट दाखले तयार करुन जमीन विक्री, 2.20 कोटींच्या फसवणुकीचा आरोप; संयिताला जामीन नाकारला

अशी झाली फसवणूक

पुण्‍यातील ‘एनव्‍हे इनोव्‍हेंचर्स’ या एजन्‍सीकडे दीड लाखाची एकरकमी गुंतवणूक केल्‍यास दरमहा १८ टक्‍के व्‍याज देण्‍याबरोबरच ग्राहकाला हव्‍या असलेल्‍या हॉटेलमध्‍ये चार दिवस व तीन रात्री मोफत स्‍टे देण्‍याचा वायदा करण्‍यात आला होता. त्‍यामुळे चावडीकर द्वयीने ही रक्‍कम भरली. मात्र अस्‍नोडा येथील ‘क्‍लब महिंद्रा’मध्‍ये आपली राहण्‍याची सोय करा अशी मागणी पुण्‍यातील त्‍या एजन्‍सीकडे केली असता त्‍या कंपनीकडून कसल्‍याही प्रकारचा प्रतिसाद आला नाही. त्‍यामुळे आपली फसवणूक झाली असा दावा ग्राहक द्वयीने आयोगासमोर केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com