Goa Fraud Case: त्याच जमिनीचा पुन्हा व्यवहार, म्हपाशातील एकाला 55 लाखांचा गंडा; मायलेकाविरोधात गुन्हा

Goa Fraud Case: यासंबधित नोंदणी व मुद्रांक विभागाकडे नोंदणी झाल्याचे देखील उघड झाल्याचे समोर आले आहे.
Goa Fraud Case
Goa Fraud CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Fraud Case

2012 साली दुसऱ्याला विक्री केलेल्या जमिनीचा पुन्हा व्यव्हार करुन म्हपशातील एकाला तब्बल 55 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी धारगळ, पेडणे येथील मायलेकाविरोधात पेडणे पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश नाईक (रा. म्हापसा, बार्देश) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली असून, विजया प्रभू देसाई आणि देवेंद्र प्रभू देसाई (दोघेही रा. धारगळ, पेडणे) यांच्या विरोधात पेडणे पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संशयितांनी कट रचून 428/0 या सर्व्हे क्रमांकातील जमीन प्रकाश नाईक या व्यक्तीला 55 लाख रुपयांना विक्री करुन फसवणूक केली. याप्रकरणी समोर आलेल्या माहितीनुसार, 2012 सालीच संतोष दहिया या व्यक्तीला ही जमीन विक्री करण्यात आली होती. यासंबधित नोंदणी व मुद्रांक विभागाकडे नोंदणी झाल्याचे देखील उघड झाल्याचे समोर आले आहे.

Goa Fraud Case
Goa Power Tariff Hike: वीज दरवाढ का आवश्यक? मुख्यमंत्री डॉ. सावंतांनी सांगितले कारण

फसवणूक झाल्याचे समोर आल्यानंतर प्रकाश नाईक यांनी पेडणे पोलिसांत धाव घेत प्रभू देसाई मायलेकाविरोधात तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून, अधिक तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Kerala MLA MP Cabinet Berth Fraud Scam
300 five star hotels fraud case
Fake ED Kidnapping Case Goa
Goa State Cooperative Bank Loan Fraud
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com