Goa Fraud Case: बंगल्यासाठी जमीन देण्याचा वादा; मुंबईच्या अ‍ॅड फिल्म डिरेक्टरला गोव्यातील दाम्पत्याचा दीड कोटींचा चुना

Goa Fraud Case: मल्होत्रा यांनी ५१ लाखांचे तीन चेक दिले खरे पण त्यांचे बँक खाते बंद असल्याने चेक वटलेच नाहीत.
Goa Fraud Case
Goa Fraud CaseDainik Gomantak

Goa Fraud Case

बंगल्यासाठी जमीन विकण्याच्या बहाण्याने गोरेगाव येथील एका जाहिरात चित्रपटाच्या दिग्दर्शकाची १.५३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी गोव्यातील रिअल्टर दाम्पत्यासह अन्य आठ जमीन मालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील 50 वर्षीय ॲड फिल्म दिग्दर्शकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विक्रम देव मल्होत्रा ​​त्याची पत्नी रितू आणि गोव्यातील आठ जमीन मालकांवर फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार 2020 मध्ये मल्होत्रा यांच्या माध्यमातून त्यांच्या मित्राच्या संपर्कात आले. याचवर्षी नोव्हेंबरमध्ये मल्होत्रा यांनी तक्रारदाराच्या गोरेगाव येथील घरी भेट देत गोव्यातील काही प्लॉट्सची माहिती दिली.

तक्रारदाराने डिसेंबरमध्ये बार्देश, गोव्यात येऊन संबधित प्लॉट्सला भेट दिली व त्यातील एक 84 लाख रुपयांना विकत घेण्याचे निश्चित केले. या प्लॉटसाठी तक्रारदारने पाच लाख रुपये टोकन म्हणून दिले तसेच, ३.२५ लाख रुपये मल्होत्रा यांना कमिशन म्हणून दिले. पुढे जमीन मालकाच्या उपस्थित फेब्रुवारी २०२१ मध्ये यासाठी सामंजस्य करार झाला.

Goa Fraud Case
Mapusa: तोल गेला अन् खाली कोसळली; म्हापशात विहिरीत पडलेल्या वृद्धेला जीवदान

दरम्यान, कोरोना काळात जमीन खरेदी विक्री व्यव्हार नोंदणी बंद होते. याकाळात मल्होत्रा तक्रारदारांकडे जात आणखी काही प्लॉट स्वस्त दरात उपलब्ध असल्याची माहिती दिली. भविष्यात यातून चांगला परतावा मिळू शकतो असे आमिष देऊन त्याने तेही प्लॉट्स खरेदी करण्याची गळ त्यांना घातली.

तक्रारदारांनी आणखी काही पैसे मल्होत्राला पाठवले. पण, तो पुढील नोंदणी प्रक्रिया करत नसल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. पुढे काहीच होत नसल्याने दोन वर्षानंतर तक्रारदाराने पैसे पर मागितले. मल्होत्रा यांनी ५१ लाखांचे तीन चेक दिले खरे पण त्यांचे बँक खाते बंद असल्याने चेक वटलेच नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com