CJI Dr. D.Y Chandrachud in Goa Dainik Gomantak
गोवा

CJI Dr. D.Y Chandrachud: आता कोकणीसह मराठीत होणार सुप्रीम कोर्टाच्या निवाड्यांचे अनुवादन; CJI चंद्रचूड यांचं गोव्यात मोठं वक्तव्य

CJI Dr. D.Y Chandrachud in Goa: पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत असतानाच डॉ. चंद्रचूड यांनी मराठी आणि कोंकणीमध्ये होणाऱ्या न्यायालयीन अनुवादासह इतर अनेक महत्वाच्या मुद्यांवर प्रकाश टाकला

गोमन्तक डिजिटल टीम

सर्वोच्य न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत आज (दि. १९ ऑक्टोबर) मेरशी येथे उभारलेल्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री व गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांच्यसह राजभवनात पुस्तक प्रकाशन सोहळ्याला उपस्थिती लावली. या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत असतानाच डॉ. चंद्रचूड यांनी मराठी आणि कोंकणीमध्ये होणाऱ्या न्यायालयीन अनुवादासह इतर अनेक महत्वाच्या मुद्यांवर प्रकाश टाकला.

मराठी आणि कोंकणीमध्ये निवडयांचा अनुवाद:

आत्तापर्यंत सर्वोच्य न्यायालयाचे ३७ हजार निवाडे हिंदीमध्ये अनुवादित झाले आहेत आणि यापुढे सर्वोच्य न्यायालयाचे निवाडे मराठी आणि कोंकणीमध्ये देखील अनुवादित केले जातील अशी मोठी घोषणा त्यांनी याच दरम्यान केली.

भारताच्या स्थानिक भाषांमध्ये हे निवाडे अनुवादित करून आम्ही एक नवीन संदेश दिला आहे असेही ते म्हणालेत. मुंबई उच्च न्यायालयाचे निवाडे व आदेश स्थानिक भाषेत उपलब्ध होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली असून सर्वोच्य न्यायालयात कोंकणी भाषेतून निवडयांचे भाषांतर करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती दिली.

चंद्रचूड गोव्यावर खुश:

डॉ. धनंजय चंद्रचूड गोव्यात होणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक विकासावर खुश झाले आणि त्यांनी या बदलांसाठी राज्याचे कौतुक देखील केले. आजकाल अनेक भारतीय कंपन्या परदेशात जात व्यवहार करीत आहेत मात्र येणाऱ्या काळात गोवा देखील नक्कीच जागतिक दर्जाचे आर्थिक केंद्र बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

गेल्या दोन-तीन दिवसांपूर्वी अनावरण झालेल्या नवीन न्यायदेवतेच्या मूर्तीबद्दल बोलताना ते म्हणालेत की नवीन मूर्तीच्या हातात कोणतीही तलवार नसून भारतचे संविधान आहे. मूर्तीच्या डोळ्यांवरची पट्टी कायमची हटवण्यात आली आहे, याच अर्थ असा होतो की आपला कायदा हा आंधळा नाही, तर तो सर्वांना सामान वागणूक देणारा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT