D. Y. Chandrachud: प्रत्येकवेळी गोव्यात आल्यावर खास वाटतं... CJI चंद्रचूड यांनी देशातील बेस्ट निसर्ग सौंदर्य म्हणत केलं कौतुक
Chif justice D. Y. ChandrachudDainik Gomantak

CJI D. Y. Chandrachud: प्रत्येकवेळी गोव्यात आल्यावर खास वाटतं.. CJI चंद्रचूड यांनी देशातील बेस्ट निसर्ग सौंदर्य म्हणत केलं कौतुक

Goa Nature: गोव्याचं निसर्ग सौंदर्य प्रत्येकाला खुणावतं. गर्द वनराईत वसलेला गोवा पर्यटकांच्या मनावर एक छाप सोडून जातो.
Published on

गोव्याचं निसर्ग सौंदर्य प्रत्येकाला खुणावतं. गर्द वनराईत वसलेला गोवा पर्यटकांच्या मनावर एक छाप सोडून जातो. गोव्याच्या निसर्ग सौंदर्याने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड यांनाही मनमोहीत केलं आहे. प्रत्येक वेळी गोव्यात आल्यावर खास वाटतं, असं खुद्द सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड म्हणाले. सरन्यायाधीश सध्या (19 ऑक्टोबर) गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. गोव्याला विलोभनीय निसर्ग सौंदर्य लाभलंय, असेही सरन्यायाधीश पुढे म्हणाले.

सरन्यायाधीशांचा गोवा दौरा

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ. डी. वाय. चंद्रचूड आज (19 ऑक्टोबर) न्यायमूर्ती प्रसन्ना बी. कराळे आणि न्यायमूर्ती संजय करोळ यांच्यासह गोवा दौऱ्यावर आहेत. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या हस्ते मेरशी येथे उभारण्यात आलेल्या जिल्हा व सत्र न्यायालय संकुलाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत उद्धाटन करण्यात आले.

D. Y. Chandrachud: प्रत्येकवेळी गोव्यात आल्यावर खास वाटतं... CJI चंद्रचूड यांनी देशातील बेस्ट निसर्ग सौंदर्य म्हणत केलं कौतुक
CM Pramod Sawant: राष्ट्रीय प्रवासात 'गोवा' महत्त्वाची भूमिका बजावेल! मुख्यमंत्री सावंतांनी व्यक्त केला विश्वास

पुस्तक प्रकाशन!

मेरशीतील जिल्हा व सत्र न्यायालय संकुलाच्या उद्घाटनानंतर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत राजभवनात पुस्तक प्रकाशन सोहळ्याला हजेरी लावली. सरन्यायाधीश चंद्रचूड आणि राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी 'TRADITIONAL TREES OF BHARAT' पुस्तकाचे प्रकाशन केले.

पुस्तक प्रकाशन सोहळ्यातील आपल्या भाषणात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला. भाषणादरम्यान सरन्यायाधीश म्हणाले की, 'TRADITIONAL TREES OF BHARAT' या पुस्तकात भावी पिढ्यांना शिक्षित करण्याची प्रचंड क्षमता आहे. अन्य भारतीय भाषांसह हे पुस्तक ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात यावे.'

D. Y. Chandrachud: प्रत्येकवेळी गोव्यात आल्यावर खास वाटतं... CJI चंद्रचूड यांनी देशातील बेस्ट निसर्ग सौंदर्य म्हणत केलं कौतुक
CM Pramod Sawant: परप्रांतीयांचा मुद्दा तापणार; मुख्यमंत्री सावंतांनी थेटच सांगितलं, 'प्रत्येक क्षेत्रात घुसखोरी'

गोव्याकडे आर्थिक केंद्र बनण्याची क्षमता

सरन्यायाधीश आपल्या भाषणादरम्यान पुढे असेही म्हणाले की, 'आर्बीट्रेशन केंद्रासारख्या माध्यमातून जागतिक स्तरावरील आर्थिक केंद्र बनण्याची गोव्याकडे क्षमता आहे.' तसेच, मुंबई उच्च न्यायालयाचे निवाडे आणि आदेश स्थानिक भाषामध्ये उपलब्ध करुन देण्याची गरजही यावेळी सरन्यायाधीशांनी बोलून दाखवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com