Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

तम्नार प्रकल्पाला विरोध केला नाही : सुदिन ढवळीकर

आम आदमी पक्षाच्या विधानाचा निषेध

दैनिक गोमन्तक

पणजी : विरोधात असताना मी कधीच तम्नार वीज प्रलकल्पाला विरोध केला नाही. उलट प्रकल्‍प चांगला असल्याचे भाषण विधानसभेत केले होते. आम आदमी पक्षाला (आप) ते काय बोलतात त्याबद्दल त्यांना माहिती नसल्याचे दिसून येते. माझ्यावर टीका करण्यापूर्वी त्यांनी स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे, असा पलटवार वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी केला. पर्वरी येथील मंत्रालयात ते पत्रकारांशी बोलत होते.

विरोधात असताना ढवळीकर यांनी तम्नार प्रकल्पाच्या विरोधात विधानसभेत भाषण केल्याचे आपने विधान केले होते, त्यावर ते बोलत होते. तम्नार प्रकल्पावर विधानसभेत भाषण केले होते. परंतु, त्यात देखील प्रकल्पाचे समर्थन केले होते. राज्यात अतिरिक्त विजेची आवश्‍यकता असून सुमारे 200 मेगावॉट तुटवडा आहे. तम्नार प्रकल्पातून सुमारे एक हजार 200 मेगावॉट सौर्य ऊर्जा निर्माण होणार आहे. याचा फायदा राज्याला होणार आहे, असे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.

विधानसभेत प्रकल्पावर बोतलताना केवळ वृक्षतोडीला आक्षेप घेतला होता. कारण पर्यावरणदृष्ट्या ते वाईट आहे. त्यासाठी सुपा येथून गोव्यात येणारी समांतर वीजवाहिनी आणण्याची सूचना केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने देखील आपल्या निरीक्षणात पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा उल्लेख केला असल्याने माझे म्हणणे खरे ठरले आहे, असे ढवळीकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारतासाठी टेन्शन फ्री बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीवरील कडक निर्बंध केले शिथिल; जागतिक बाजाराला दिलासा

Smart Meter Scheme: स्मार्ट वीज मीटरवर मानवाधिकार आयोगाचा हिरवा कंदील; तरी गोव्यात योजना तूर्तास स्थगितच

Horoscope: नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची कृपा! मेष ते मीन, 12 राशींचे आजचे राशिभविष्य; कोणाला मिळणार धनलाभ?

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

SCROLL FOR NEXT